31 October 2020

News Flash

‘जीव झाला येडापिसा’ आणि ‘राजा रानीची गं’ जोडी मालिकांमध्ये गणरायाचे आगमन!

बाप्पाच्या आगमनाची चाहूल सगळीकडे लागली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल सगळीकडे लागली आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी बाप्पाचे आगमन होणार आहे. कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा आणि राजा रानीची गं जोडी मालिकांमध्येही गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात होणार आहे.

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये लष्करेंच्या घरामध्ये बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे. शिवा बाप्पाची स्थापना करणार आहे. सिध्दी आणि शिवाने बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. लष्करेंच्या घरात थाटामाटात आगमन तर होणार आहे पण या प्रसंगी शिवा आणि संपूर्ण कुटुंबाला एक सरप्राइज देखील मिळणार आहे. अचानक मिळालेल्या खास भेटीमुळे शिवा खूश होईल का ? कोणाकडून आली असेल ही भेट ? काय असेल त्यात ? हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे.

याचसोबत राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये देखील गणरायाचे आगमन होणार आहे. रणजीत आणि संजुचा लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. त्यामुळे ढालेपाटलांच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे. संजु आणि रणजीतने बाप्पासाठी विशेष तयारी केली आहे. मालिकांचे गणपती विशेष भाग सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ आणि रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 6:09 pm

Web Title: ganapati celebration in jeev jhala yedapisa and raja ranichi ga jodi serials ssv 92
Next Stories
1 ‘वैजू नंबर वन’ मालिकेच्या सेटवर बाप्पाचा थाट
2 बॉलिवूड माफियांमुळे सारा-सुशांतचा ब्रेकअप झाला? सुशांतच्या मित्राची पोस्ट व्हायरल
3 अग्गंबाई सासूबाई : आता अभिजीत होणार बबड्या?
Just Now!
X