राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती आहे. राजकीय नेत्यांपासून विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी गांधीजींना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील आपल्या अनोख्या शैलीत गांधीजींना प्रणाम केला. लक्षवेधी बाब म्हणजे चरखा चालवून त्यांनी संपूर्ण देशाला गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. योगी आदित्यनाथ यांचा चरखा चालवताना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अभिनेत्री रिचा चड्ढा हिने प्रतिक्रिया दिली. ट्रेंड खरेदी करण्यासाठी तुम्ही ज्या पैशांचा वापर करताय त्यातील प्रत्येक नोटेवर तुम्हाला गांधीजीच दिसतील, असा उपरोधीक टोला तिने लगावला आहे.

अवश्य पाहा – बिग बॉस १४ मध्ये झळकणार ग्लॅमरस पवित्रा; ७ दिवसांसाठी मिळणार लाखो रुपयांचं मानधन

Jitendra Awhad sunil tatkare
“…म्हणून शरद पवार तुम्हाला भाजपाशी चर्चा करायला सांगायचे”, जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंना टोला
satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
bachchu kadu devendra fadnavis (२)
फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलंय? बच्चू कडू म्हणाले, “अमरावतीच्या सभेत त्यांनी…”
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य

“तुम्ही कितीही ट्रेंड खरेदी करा पण प्रत्येक नोटेवर तुम्हाला गांधीजीच दिसतील. तुम्ही त्यांना कितीही विरोध करा पण सर्वत्र तुम्हाला गांधीच दिसतील. मन मारुन का होईना तुम्हाला गांधींसमोर डोकं टेकावच लागतं. सत्यमेव जयते.” अशा आशयाचं ट्विट करुन रिचाने योगी आदित्यनाथ यांना उपरोधिक टोला लगावला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “प्यार एक धोका हैं…” अभिनेत्रीला प्रियकराने फसवलं: दुसऱ्याच तरुणीबरोबर केलं लग्न

महात्मा गांधी हे नाव घेतले की, भारतीय स्वातंत्र्यलढा डोळ्यासमोर येत असला तरी गांधी फक्त स्वातंत्र्यापुरते मर्यादित नव्हते. गांधींनी समाजात विचारांचा पायाही रचला. सत्य, अहिंसा, प्रेमाचा संदेश देत सत्याग्रहाच्या मार्गाने समाजाला संघटित केले. जनभावनेचा आदर राखून आपले विचार मांडण्याच्या गांधींच्या वृत्तीनेच हे शक्य झाले. सत्य, अहिंसा आणि प्रेम याद्वारे पुढे जाणारा समाजच अधिक प्रगत समाज असू शकतो हे त्यांचे मत होते. गांधी भारतात रामराज्याची कल्पना करत होते. पण त्यांची रामराज्याची कल्पना वेगळी होती. जातीभेद, धर्म, स्वराज्य आणि रामराज्य प्रस्थापित करण्यातील अडथळा आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. गांधी धर्मांध राजकारणाला समाजात पसरणारे विष समजतं.