अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकता कपूर पुन्हा एकदा ‘गंदी बात’ ही वेब सीरिज घेऊन येत आहे. ‘गंदी बात’ ही सीरिज बोल्ड सीन्ससाठी विशेष ओळखली जाते. या सीरिजचा ६वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘गंदी बात 6’ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
अल्ट बालाजीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘गंदी बात 6’ चा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला, आपल्याला वय विचारले जाते. या सीझनमध्ये तडका देण्यासाठी मर्डर मिस्ट्री दाखवण्यात आली आहे. या सीरिजचा ट्रेलर लाखो लोकांनी पाहिला आहे. “पडद्याच्या मागेच सगळे रहस्य दडलेले आहेत. तर जागृत राहा कारण यंदाच्या सीझनमध्ये प्रेम, लोभ, धोका, खून आणि सस्पेंस भरपूर असणार आहे” या आशयाच कॅप्शन त्यांनी ट्रेलर शेअर करत दिले आहे.
View this post on Instagram
पहिल्या सीझनपासूनच ही सीरिज चर्चेत राहिली आहे. प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता ‘गंदी बात ६’चा ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये सीरिजबाबतची उत्सुक वाढली आहे.
‘गंदी बात 6’ मध्ये महिमा गुप्ता मुख्य भूमिका साकारणार आहे. महिमा सोबत अलिशा खान, केवल दिसाणी, निधी महवन, शिवम मेहता आणि मोहित शर्मा हे कलाकार देखील दिसणार आहेत. ‘गंदी बात 6’ अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉमवर २१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2021 11:43 am