X
X

सेटवर बेशुद्ध पडली अभिनेत्री; रुग्णालयात देतेय मृत्यूशी झुंज

READ IN APP

'गंदी बात' या वेब सीरिजमध्ये ती झळकली होती.

टीव्ही अभिनेत्री व मॉडेल गहना वशिष्ठला सेटवर कार्डिअॅक अरेस्ट आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. एका वेब सीरिजची शूटिंग करत असताना गहना कार्डिअॅक अरेस्ट आल्याने अचानक खाली कोसळली. त्यानंतर तिला मालाड इथल्या रक्षा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गहनावर आयसीयूत उपचार सुरु असून तिची प्रकृती नाजूक असल्याचं समजतंय.

गहना प्रथमोपचारांना प्रतिसाद देत नव्हती. तिला श्वास घ्यायलाही अडचण होत होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. काही औषधे व त्याच वेळी घेतलेल्या काही एनर्जी ड्रिंक्समुळे गहनाच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. गुरुवारी मड आयलँड इथं एका वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली.

त्याचसोबत काहीही पौष्टिक अन्न न खाता केवळ एनर्जी ड्रिंक्स घेऊन ती ४८ तास शूटिंग करत होती. तिला मधूमेह असल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण खूप जास्त वाढलं होतं आणि रक्तदाब कमी झाला होता.

कोण आहे गहना वशिष्ठ?

गहनाने स्टार प्लस वाहिनीवरील ‘बहनें’ या शोमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तिने बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी ती ‘गंदी बात’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती.

24
X