News Flash

Ganesh Chaturthi 2017: बॉलिवूडकरांनी असे केले बाप्पाचे स्वागत

तुमच्या मनात जे काही आहे ते नक्की त्याला सांगा

सालाबादप्रमाणे याही वर्षी लाखो भक्तांनी गणरायाचे अगदी जल्लोषात स्वागत केले. या दिवसांमध्ये प्रत्येक भाविक बाप्पाची मनोभावे पूजा करतो. या भक्तांमध्ये बॉलिवूड कलाकार तरी कसे मागे राहतील. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या बाप्पांसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सलमान खान, हृतिक रोशन, ऋषी कपूर, गोविंदा, अनिल कपूर आणि शिल्पा शेट्टी या कलाकारांकडे दरवर्षी गणपती येतो.

उर्वशी रौतेलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत म्हटले की, ‘गणेश चतुर्थीच्या सर्वांनाच शुभेच्छा. विघ्नहर्ता सर्वांचे विघ्न दूर करो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान येवो.’

मंदिरा बेदीनेही इन्स्टाग्रामवर गणपतीसोबतचा एक फोटो शेअर करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. सगळ्यांचा आवडता असा तो अखेर परत आलाय..  मग तुमच्या मनात जे काही आहे ते नक्की त्याला सांगा, तो तुम्हाला त्या सर्वांचे उत्तर देईलही

तर दुसरीकडे विवेक ओबेरॉय आणि संजय दत्त यांनीही आपल्या बाप्पाचे स्वागत फार उत्साहात केले. विवेकसाठी हा गणेशोत्सव खास आहे. यंदा विवेकने तामिळ सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘विवेगम’ या तामिळ सिनेमा विवेक आहे आणि या सिनेमाने आतापर्यंत चांगला गल्ला कमवला आहे. संजयसाठी हा गणेशोत्सव थोडा खास आहे. कारण दीर्घकाळानंतर संजय मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. त्याचा ‘भूमी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. संजयने या सिनेमात एक गणेश आरतीही गायली आहे.

ऋषी कपूर यांनीही बाप्पाचा आशीर्वाद घेत मुर्तीसमोर नतमस्तक झाले. तसेच अभिनेत्री अनुष्का शर्मानेही ट्विटरवर सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

Next Stories
1 Judwaa 2 song Chalti Hai Kya 9 Se 12: ‘चलती है क्या ९ से १२’ गाण्याला वरुण, जॅकलिन, तापसीचा हटके ट्विस्ट
2 एक वर्षाची झाली मिशा; शाहिदने शेअर केला क्यूट सेल्फी
3 तिहेरी तलाक, राइट टू प्रायव्हसीवर ट्विंकलचा विनोद वाचलात का?
Just Now!
X