17 January 2021

News Flash

Ganesh Utsav 2018 : घ्या कलाकारांच्या घरच्या गणरायांचे दर्शन

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी ट्विटवर फोटो पोस्ट केले आहेत

कलाकारांच्या घरचे बाप्पा

महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक असणाऱ्या गणेशोत्सवाला आज गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली. अनेकांनी आज अगदी वाजत गाजत गणरायांचे आपल्या घरी स्वागत केले. ढोल ताशांचा गजर, फुलांची आरास, मोदकाचा नैवेद्य अशा थाटात गणपती बाप्पांचे जंगी स्वागत करण्यात आले. अगदी आगत्याने गणरायांचे स्वागत करणाऱ्यांमध्ये अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटीज सर्वांचाच समावेश आहे. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून खास वेळ राखून ठेवत गणपती बाप्पांचे स्वागत केले आहे. अनेक बडे कलाकार आता पुढील काही दिवस बाप्पांच्या सेवेतच वेळ घालवणार आहेत. तर अनेकजण मुंबईमधील बड्या मंडळांमध्ये जाऊन गणरायांचे दर्शन घेतील. आज दिवसभर अनेक सिलेब्रिटीजने गणपतींचे अगदी सोशल मिडियावरूनही स्वागत केले. काहींनी केवळ गणपती बाप्पा मोरयाची हाक दिली तर काहींनी घरातील गणरायांबरोबर सेल्फी पोस्ट करत आपल्या चाहत्यांना फोटोच्या माध्यमातून घरच्या गणेशाचे दर्शन घडवले. जाणून घेऊयात कोणी कोणी काय ट्विट केले आहे गणरायांचे स्वागत करताना…

रितेश देशमुख

स्वप्नील जोशीच्या घरचा गणपती

सुबोध भावेच्या घरचा गणपती

सोनाली कुलकर्णी

दिपीका पादुकोण

पल्लवी सुभाष

अमृता खानविलकर

तुषार कपूर

माधुरी दिक्षित

सनी देओल

चिरंजीवी

अनिल कपूर

किर्ती सेनॉन आणि कार्तिक आर्यनचा सेटवरील गणेशोत्सव

काजल अग्रवाल

सई ताम्हणकर

दक्षिणेतील अभिनेता सिद्धार्थच्या घरचा गणपती

या सेलिब्रिटींबरोबरच शिल्पा शेट्टी, ऋषी कपूर, नाना पाटेकर यांच्या घरीही गणरायांचे आगमन झाले आहे. एकंदरीतच काय तर सामान्यांबरोबरच सेलिब्रिटीजही गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 2:38 pm

Web Title: ganesh chaturthi 2018 celebrities from marathi and hindi film industry pour in wishes for the festival
Next Stories
1 ब्रेट लीने घेतले जीएसबीच्या बाप्पाचे दर्शन
2 मुंबईतील ‘हा’ गणपती सजतो ७० किलो सोन्याने
3 पारशी कुटुंबीयांकडून  श्री गणेशाची प्रतिष्ठापना
Just Now!
X