05 March 2021

News Flash

‘बांदेकरांना गलेलठ्ठ आणि पोटावर नाग असलेला बाप्पा आवडतो’

गणरायाच्या मूर्तीवर पोटावर नाग असणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे असते.

सुचित्रा बांदेकर

गेली कित्येक वर्षे आमच्या घरी बाप्पाचे आगमन होतेय. बांदेकरांचा बाप्पा म्हणजे माझ्या सासुरवाडीला पूर्वी वाडोसं येथे बाप्पाचं आगमन व्हायचं. वाडोस हे गाव कुडाळ सावंतवाडीच्या मध्ये वसलेलं आहे. आधी आम्ही सगळे बांदेकर कुटुंब गावी गणपतीसाठी जायचो आणि मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करायचो. पण नंतर नोकरीमुळे नंतर जाणं फार कमी होऊ लागलं. कोणी सुरुवातीच्या दिवसांमध्ये तर कोणी शेवटी शेवटी गावी जात असे. त्यामुळे मग आम्ही आदेशचा मोठा भाऊ अवदूत बांदेकरच्या डोबिंवलीच्या घरी बाप्पाची स्थापना करू लागलो. त्यानंतर आता गेल्या काही वर्षांपासून मुलुंडला आदेशचा चुलत लहान भाऊ महेशच्या घरी बाप्पाची स्थापना केली जाते. आमचं बांदेकरांचं कुटुंब इतकं मोठ आहे की संपूर्ण घर भरून जातं. आदेशला तीन काका आणि तीन आत्या असं मोठ कुटुंब आहे. त्यामुळे सर्वजण आम्ही गणपतीला एकत्र जमतो.
आमच्या घरी सात दिवसांसाठी बाप्पा विराजमान होतात. यादरम्यान साग्रसंगीत बाप्पाची पूजा केली जाते. बाप्पासाठी फुलांची आरास केली जाते. बांदेकरांना अगदी साधी बैठी बाप्पाची मूर्ती आवडते. ट्रेण्डनुसार बाप्पाची मूर्ती आणणे ही संकल्पना आम्हाला कोणालाचं पटत नाही. आम्हाला सर्वांनाच मस्त बसलेला, गलेलठ्ठ आणि पोटावर नाग असलेला बाप्पा आवडतो. गणरायाच्या मूर्तीवर पोटावर नाग असणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे असते. बांदेकरांना गणपतीच्या मूर्तीत कोणताही बदल केलेला चालत नाही. पहिल्या दिवशी आम्ही नैवेद्यात आठ ते नऊ भाज्या करतो. सात दिवस बाप्पासाठी वेगवेगळ्या भाज्यांचा आणि मोदकाचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर गौरीला वडे आणि काळ्या वाटाण्याच्या उसळीचा नैवेद्य दाखविला जातो. आमच्या घरी गोट्यांपासून बनवलेली गौरी आणली जाते.
दरवर्षी मी आणि आदेश लालबागच्या राजाला किंवा गणेश गल्लीच्या गणपतीला जातो. आपण आता जे काही बोलतो की मंडळांमध्ये स्पर्धा केली जातेय वगैरे हे तिथे गेल्यावर मात्र कुठेच दिसत नाही. सर्वजण बाप्पाच्या आगमनाने इतके आनंदी झालेले असतात. विशेष म्हणजे बाप्पा आल्यानंतर सर्व वातावरण प्रफुल्लित तर होतेच पण सर्वांच्या चुकाही बाप्पा आपल्या पदरात घेतो.
adesh bandekar

शब्दांकन- चैताली गुरव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 9:37 am

Web Title: ganesh festival celebration by actor suchitrra bandekar
Next Stories
1 दिग्गज क्षेत्ररक्षकाने क्रिकेटच्या देवाच्या घरी जाऊन घेतले बाप्पाचे दर्शन
2 ‘बाप्पासाठी कोकणातला जुना मोठा वाडा उघडला जातो’
3 ‘लालबागचा राजा, दगडूशेठचा गणपती यांच्याशी तुलना करून काय उपयोग?’
Just Now!
X