News Flash

गणेशोत्सव विशेष : लग्नानंतरचा आमचा तिसरा गणेशोत्सव- हेमंत ढोमे

आमच्या पुण्याच्या घरी दीड दिवसाचा गणपती आणतात. लग्नानंतरचा हा आमचा तिसरा गणपती. मुळात केवळ दीड दिवसांचा गणपती असल्यामुळे बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत आम्ही सर्वच त्याच्या

| August 30, 2014 12:35 pm

आमच्या पुण्याच्या घरी दीड दिवसाचा गणपती आणतात. लग्नानंतरचा हा आमचा तिसरा गणपती. मुळात केवळ दीड दिवसांचा गणपती असल्यामुळे बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत आम्ही सर्वच त्याच्या तयारीला लागलेले असतो. गणपतीची संपूर्ण सजावट आम्ही सर्वजण मिळून करतो. ताज्या फुलांची आरास गणपतीच्या मकराभोवती केली जाते. यादरम्यान, मित्रमंडळी आणि नातेवाईकांची भेट होते त्यामुळे हा सण आमच्यासाठी गेट टूगेदरसुद्धा असतो. क्षितीसुद्धा बाप्पाचा नैवेद्य स्वतः करते. तिलादेखील गणपतीची खूप आवड आहे. घरच्यांसाठी नवीन कपड्यांची खरेदीही ती करते.
लहानपणापासून मला गणपतीचे वेड आहे. इतरांच्या घरी गणपतीची मूर्ती आणलेली बघितली की आपल्याही घरी गणरायाला आणावे असे वाटायचे. तेव्हापासून आम्ही दीड दिवसांचा गणपती आणायला लागलो. आमची मूर्तीदेखील ठरलेली आहे. दरवर्षी पेशवे प्रकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही करतो. या दीड दिवसात मी कोणतेचं काम हातात घेत नाही. केवळ दीड दिवस बाप्पा आपल्या घरी येतो. तेव्हा त्याला आपण पूर्ण वेळ दिला पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे अगदी किती महत्त्वाचे काम असले तरी मी ते हाती घेत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2014 12:35 pm

Web Title: ganesh festival celebrity special says hemant dhome
Next Stories
1 ‘मेरी कोम’ महाराष्ट्रात करमुक्त
2 ब्रॅड पिट-अँजेलिना जोलीचा फ्रान्समध्ये गुपचुप विवाह
3 ‘रॉ स्टार’चे चित्रीकरण चार तास खोळंबले
Just Now!
X