24 November 2020

News Flash

“नराधमांना जबर शिक्षा द्या”; हाथरस येथील बलात्काराच्या घटनेवर हेमंत ढोमे संतापला

उत्तर प्रदेशमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर आज (मंगळवार) उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. या अमानुष घटनेवर मराठी अभिनेता हेमंत ढोमे याने संताप व्यक्त केला आहे. “ही माणुसकीला अतिशय गलीच्छ पातळीवर नेणारी घटना आहे”, असं म्हणत त्याने आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यापूर्वी अक्षय कुमार, स्वरा भास्कर, कंगना रनौत, मीरा चोप्रा, रिचा चड्ढा, रितेश देशमुख यांसारख्या अनेक कलाकारांनी या घटनेवर संताप व्यक्त केला होता.

अवश्य पाहा – महिला कलाकारांचीच चौकशी का केली जातेय?; अभिनेत्रीचा NCBला सवाल

 

दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ छाटून तिची मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला आहे. यामुळे अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली.

पीडित तरुणीने चार तरुणांनी आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी ८ दिवसांनंतर सामूहिक बलात्काराचं कलम एफआयआरमध्ये समाविष्ट केलं होतं. या प्रकरणी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी पीडित तरुणीची भेट घेतली होती. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी देखील याप्रकरणी योगी सरकारवर निशाणा साधला होता. हे प्रकरण चांगलंच तापल्यानंतर युपी सरकारने पीडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही जाहीर केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 7:14 pm

Web Title: gang raped hathras women dies akshay kumar swara bhaskar hemant dhome mppg 94
Next Stories
1 ‘बिग बॉस १४’मध्ये होणार राधे माँ यांची एण्ट्री
2 अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अरबाजने केला मानहानीचा दावा
3 “दोषींना फाशी द्या”; सामूहिक बलात्काराच्या घटनेवर अक्षय कुमार संतापला
Just Now!
X