02 December 2020

News Flash

“त्या वेळी रामदास आठवले कुठे होते?”; ‘तो’ फोटो पाहून स्वरा भास्कर संतापली

कंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. यावेळी तिने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या अभिनेत्री पायल घोषला रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच तिला ‘वाय श्रेणी’तील सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेवर स्वराने संताप व्यक्त केला आहे.

अवश्य पाहा – VIDEO: संतापलेल्या अभिनेत्याचं शक्ती प्रदर्शन; हातांनीच केले लोखंडी गेटचे दोन तुकडे

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. आज उपचारांदरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला. “या पीडितेच्या मदतीसाठी रामदास आठवले पुढे का आले नाहीत? पायल पेक्षा या पीडितेच्या कुटुंबीयांना त्यांच्या मदतीची गरज अधिक होती.” अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने रामदास आठवले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – महिला कलाकारांचीच चौकशी का केली जातेय?; अभिनेत्रीचा NCBला सवाल

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 5:41 pm

Web Title: gang raped hathras women dies ramdas athawale payal ghosh swara bhaskar mppg 94
Next Stories
1 दिग्दर्शकाला भाजी विकताना पाहून मालिकेची टीम आली मदतीला धावून…
2 RCB-मुंबई सामना पाहून सुनील शेट्टी म्हणाला, “भाई लोग, …”
3 Video : ‘आई माझी काळुबाई मालिका पौराणिक नाही,तर…’
Just Now!
X