मध्य मुंबईतील ताडदेव विभागातील २००० साली बंद झालेल्या गंगा जमुना या जुळ्या थिएटर्सची इमारत धोकादायक झाल्याचे वृत्त अलिकडेच लोकसत्ता मुंबई वृत्तांतने दिले होते. आता ही इमारत पाडली जाईल असे वृत्त आज एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी जुळी, तिळी चित्रपटगृहे असले तरी त्यांची सुरुवात गंगा जमुनामुळे झाली होती. त्याकाळात वातानुकू लित असलेल्या या चित्रपटगृहाची सुरुवात ‘हरे रामा हरे कृष्णा’ या सुप्रसिद्ध चित्रपटापासून झाली.

अनेक चित्रपटांनी येथे रौप्य महोत्सवी आठवडे अनुभवले. तर, काही चित्रपट ५० आठवडय़ांहून अधिक काळ येथे गाजले. ‘जान हाजीर है’ हा चित्रपट तब्बल ७५ आठवडे जमुनामध्ये चालला होता. ७० च्या दशकात मुंबईत मोठय़ा चित्रपटगृहांच्या यादीत गंगा जमुनाचा समावेश होता. सन २००८ मध्ये या चित्रपटगृहाची पुनर्बाधणी करण्यात येणार होती. त्याकरीता जो आराखडा तयार करण्यात आला होता त्याला पालिकेने मंजूरीही दिली होती. मात्र त्याचे पुढे काहीच न झाल्यामुळे ही वास्तू गेली पंधरावर्षे नुसतीच उभी आहे.

या जुळ्या थिएटर्समध्ये ‘जवळ ये लाजू नको’ (1976) हा प्रदर्शित झालेला एकमेव मराठी चित्रपट होय.