18 February 2020

News Flash

“मला बायल्या चिडवायचे, टॉयलेटला गेल्यानंतर मागे यायचे”, प्रणितने सांगितला गंगापर्यंतचा खडतर प्रवास

गंगा एक ट्रान्सजेंटर असून तिचं खरं नाव प्रणीत हाटे आहे

झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीनच्या निमित्ताने सध्या एक गंगा हे नाव चर्चेत आहे. गंगा एक ट्रान्सजेंटर असून तिचं खरं नाव प्रणीत हाटे आहे. रिअ‍ॅलिटी शोमुळे गंगा आज घराघरात पोहोचली आहे. मात्र तिचा प्रणित ते गंगापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. लहानपणापासून तिला अनेक अपमान, टोमणे सहन करावे लागले. डान्सिंग क्वीनच्या मंचावर बोलताना तिने आपला खडतर प्रवास बोलून दाखवला. आपला हा प्रवास सांगताना ती भावूक झालेली पहायला मिळाली.

“हाटे कुटुंबात पहिला मुलगा जन्माला आला तो मीच. जन्माला मुलगा आला पण तो आत्मा एका मुलीचा होता. मला लहानपणापासून एक सुंदर मुलगी होण्याची इच्छा होती. मी बाहेर कधी मुलांमध्ये खेळायला जायची तेव्हा हा बायल्या आहे असं म्हणत चिडवायचे. माझ्यासोबत कोणी राहायचंही नाही. मला जेव्हा टॉयलेटला जायचं असायचं तेव्हा क्लास सुरु असतानाच जावं लागायचं. मधल्या सुट्टीत गेल्यानंतर माझी फार वाईट अवस्था व्हायची. जर क्लास सुरु असताना टॉयलेटला जाण्यासाठी हात वर केला की अजून दोन तीन हात वर यायचे. ते विद्यार्थी माझ्या मागे यायचे. हे सर्व खूप तणाव निर्माण करणारं होतं. पण मी ते कधी जाणवू दिलं नाही. कारण मला हे नेमकं काय सुरु आहे हेच माहिती नव्हतं,” हे सर्व सांगताना गंगाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

पाहा फोटो – …अन् प्रणितची गंगा झाली, जाणून घ्या तिच्या खडतर प्रवासाबद्दल

“फक्त आपण जे काही वागत आहोत त्याला बायल्या म्हणतात इतकंच कळत होतं. माझ्यावर तू फक्त साडी घालण्याच्या लायकीचा आहे अशा कमेंट करण्यात आल्या. हो मी साडी नेसण्यास तयार आहे. माझ्यात तेवढी हिंमत आहे,” असं यावेळी तिने आपल्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं. पुढे बोलताना तिने कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्याने गंगा आज इतक्या खंबीरपणे उभी आहे. असे कित्येक प्रणित आणि गंगा आहेत ज्यांना कुटुंबाचा पाठिंबा नाही अशी खंतही बोलून दाखवली.

First Published on January 20, 2020 5:21 pm

Web Title: ganga journey from pranit hate zee yuva dancing queen sgy 87
Next Stories
1 बुडणाऱ्या प्रितीला वाचवण्यासाठी धावला श्वान
2 Hacked trailer: पहिल्याच चित्रपटात हिना खान देणार हॉट सीन्स
3 या अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचं कळलं तीन दिवसांनी !
Just Now!
X