News Flash

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गंगाराम गवाणकर यांची निवड

'वस्त्रहरण‘ या गाजलेल्या नाटकाचे लेखन गवाणकर यांनी केले आहे.

९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
‘वस्त्रहरण‘ या गाजलेल्या नाटकाचे लेखन गवाणकर यांनी केले आहे.  ‘वस्त्रहरण’नंतर गवाणकरांनी मोजकी, पण दर्जेदार नाटकं लिहिली. त्यामध्ये ‘दोघी’, ‘वन रूम किचन’ यांसारख्या नाटकांचा समावेश आहे. मालवणी भाषेला रंगमंचावर आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. याआधी बेळगाव येथे झालेल्या ९५ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद फैयाज शेख यांनी भूषविले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 4:26 pm

Web Title: gangaram gavankar elected as chairman of akhil bhartiya natya sammelan
Next Stories
1 आलिया मराठीत ‘रुंजी’ घालणार
2 ‘बोल्ड प्रोमो’चा संसर्ग मालिकांनाही
3 उज्ज्वल भविष्यासाठी इतिहासाकडे पाठ फिरवून कसं चालेल..
Just Now!
X