11 August 2020

News Flash

अबू सालेम ‘संजू’ला कोर्टात खेचणार

...तर संजूच्या अडचणी वाढवण्यासाठी सालेमने 'हे' पाऊल उचलण्याचाही निर्णय घेतला आहे.

संजू, अबू सालेम, sanju abu salem

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्याचे विविध प्रसंग सर्वांसमोर मांडणाऱ्या ‘संजू’ या चित्रपटाविरोधात आता गँगस्टर अबू सालेम उभा ठाकला आहे. त्याने चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून चित्रपटात आपल्याविषयी चुकीची माहिती देण्यात आल्याचं त्यात म्हटलं आहे. इतकच नव्हे तर त्याने चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल निर्माते- दिग्दर्शकांनी आपली माफी मागावी अशी मागणीही केली आहे.

पुढील पंधरा दिवसांमध्ये निर्मात्यांनी संबंधित नोटीसमध्ये करण्यात आलेल्या मागणीवर विचार केला नाही तर, त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही सालेमने दिला. तेव्हा आता याविषयी चित्रपटाशी संलग्न व्यक्ती काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यातील प्रकाशझोतात नसलेल्या काही प्रसंगांवर भाष्य करण्यात आलं आहे. त्यातच असे काही मुद्दे अधोरेखित होत आहेत, ज्यांचा संबंध संजूबाबाच्या आयुष्यातील कठिण प्रसंगांशी जोडला जातोय.

‘गुलछबू’ इम्रान खानला नवा पाकिस्तान घडवता येईल का? – शिवसेना

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ हा २०१८ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. रणबीर कपूरची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. एक अभिनेता म्हणून नावारुपास आलेल्या संजय दत्तच्या आयुष्यातील चढउतारांवर त्यातून भाष्य करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे त्याला झालेला कारावास, त्यामागची कारण आणि अंडरवर्ल्डशी जोडलं गेलेलं त्याचं नाव या मुद्द्यांवरही दिग्दर्शकाने धावती नजर टाकल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2018 9:18 am

Web Title: gangster abu salem sends legal notice to makers of ranbir kapoor starrer bollywood movie sanju
Next Stories
1 आमच्या ‘मुल्क’शी असलेलं नातं सुधारण्यात तुम्हाला यश मिळो- ऋषी कपूर
2 ‘गुलछबू’ इम्रान खानला नवा पाकिस्तान घडवता येईल का? – शिवसेना
3 करूणानिधी यांची प्रकृती स्थिर – एम. के. स्टॅलिन
Just Now!
X