News Flash

प्रजापती दक्षंच्या साक्षीने ओंकार गणेश उलगडणार देवी पार्वतीच्या पुनर्जन्माची गाथा!

शिव पार्वतीच्या पुनर्विवाहाचा विनायकांनी हौसेने घाट घातलाय.

प्रजापती दक्षंच्या साक्षीने ओंकार गणेश उलगडणार देवी पार्वतीच्या पुनर्जन्माची गाथा!
या पुनर्विवाहातून पार्वतीचा पुनर्जन्म म्हणजेच दक्षं कन्या सतीची कथा बघायला मिळणार आहे.

कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या गणपती बाप्पा मोरया या मालिकेमध्ये प्रेक्षकांना अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. ज्या प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरल्या. मग ती मनसाची असो वा कोजागिरीची असो. नुकताच श्रीगणेशांना शिवालयात एक सुखद आणि अनपेक्षित धक्का मिळाला, त्यांचे आजोबा हिमालय आणि आजी मैनावती सर्वांच कुशल जाणून घेण्यासाठी शिवालयात आले. पण आता या मालिकेमध्ये प्रेक्षकांना अजून एक गोष्ट बघायला मिळणार आहे. श्री गणेशाच्या साक्षीने शिव पार्वतीचा पुनर्विवाह संपन्न होणार आहे. शिव पार्वतीच्या पुनर्विवाहाचा विनायकांनी हौसेने घाट घातलाय. आदिशक्ती पार्वतींच्या पुनर्जन्माबरोबरच सती जन्मातील प्रथमपूज्य श्री गणेशांच्या ओंकार रुपाचे सत्य तुम्हाला जाणून घेता येणार आहे. ही गोष्ट बघायला प्रेक्षकांना नक्कीच मज्जा येणार आहे.

श्री गणेशाने मांडलेला शिव पार्वतीच्या पुनर्विवाहाचा प्रस्ताव लवकरच पुर्णत्वाला येणार आहे. मात्र या सोहळ्यात येणारे अडथळे आणि त्यातून मार्ग काढताना गणेशाला आदिशक्तीने दिलेले संकेत या सगळ्यामधून एक महान गाथा बघायला मिळणार आहे. या पुनर्विवाहातून पार्वतीचा पुनर्जन्म म्हणजेच दक्षं कन्या सतीची कथा बघायला मिळणार आहे.  सगळ्यात महत्वाच म्हणजे या सती जन्मात साक्षात श्री गणेश ओकार रुपात सतीची साथ देणार आहे.

ganpati-bappa-morya-670

प्रजापती दक्षंच्या साक्षीने ओंकार गणेश देवी पार्वतीच्या पुनर्जन्माची गाथा उलगडणार आहेत. आदिशक्ती पार्वतींच्या पुनर्जन्माबरोबरच सती जन्मातील प्रथमपूज्य श्री गणेशांच्या ओंकार रुपाचे सत्यही तुम्हाला पाहायला मिळेल. याप्रकारे सध्य स्थितीत पुनर्विवाह, त्यानंतर सती जन्म आणि श्री गणेशाचा ओंकार अवतार लवकरच प्रेक्षकांना गणपती बाप्पा मोरया मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 8:10 am

Web Title: ganpati bappa morya serial on colors marathi 2
Next Stories
1 शाहरूखला पाहण्यासाठी बडोदा रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी, एकाचा मृत्यू
2 ग्लॅमगप्पा : प्रशंसेचा धनी
3 मी मज हरपून गातो..!
Just Now!
X