News Flash

“गणपती बाप्पा मोरया”; वरुण धवनने दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

गणरायाच्या आगमनामुळे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे.

गणेशोत्सव म्हटलं की सगळीकडे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं. संपूर्ण देशावर करोनाचं संकट असताना आज विघ्नहर्ता गणरायाचं आगमन झालं आहे. करोनामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. परंतु नागरिकांच्या मनातील उत्साह मात्र तितकाच आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याने देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

“वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, गणपती बाप्पा मोरया” असं म्हणत त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये वरुण गणपती बाप्पाचं दर्शन घेताना दिसत आहे. वरुणने ट्विट केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 6:43 pm

Web Title: ganpati bappa morya varun dhawan viral photo mppg 94
Next Stories
1 “अ‍ॅक्शन हिरोंचे फॅन असाल तर हा चित्रपट जरूर पाहा”; हृतिक रोशनचा चाहत्यांना सल्ला
2 पाहा तैमुरने आई-बाबांसाठी तयार केलेला बाप्पा; फोटो होतोय व्हायरल
3 …म्हणून निपुण धर्माधिकारीकडे करतात चांदीच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा
Just Now!
X