News Flash

‘बोनस’मध्ये पाहायला मिळणार गश्मीर महाजनी-पूजा सावंतची केमिस्ट्री

हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे.

गश्मीर महाजनी, पूजा सावंत

गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत ही नवी जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘बोनस’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे कलाकार या चित्रपटात नायक-नायिकेच्या भूमिकेत असून हा चित्रपट रंगीबेरंगी आणि सदाबहार अशा कोळीवाड्याच्या पार्श्वभूमीवर आकाराला येतो. त्यातही वेगळी भासते ती गश्मीरच्या हातातील सूटकेस. या पोस्टरमुळे या चित्रपटाबद्दलची रउत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

गश्मीर महाजनीने अगदी कमी वेळातच आपली अशी वेगळी छाप चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. देऊळबंद, कान्हा, वन वे टीकेट आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही यांसारखे त्याचे चित्रपट गाजले आणि त्यातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुक झाले. पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक सर्वात सुंदर अशा नायिकांपैकी एक आहे. तिच्या नावावर अनेक गाजलेले चित्रपट आहेत. त्यात दगडी चाळ, वृदांवन, पोश्टरबॉइज, लपाछपी, जंगली या चित्रपटांचा समावेश असून त्यांतील तिच्या मध्यवर्ती भूमिका गाजल्या आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ भावे याने केले आहे. त्यांनी कित्येक मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून त्यांत हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक आदी चित्रपटांचा समावेश आहे.

या चित्रपटाविषयी सौरभ भावे म्हणतात, “बोनस म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या नशिबात असलेली अधिकची गोष्ट. त्यात मग पैसा, आनंद आणि सुख या गोष्टींचा समावेश होतो. पण दुर्दैवाने काहींना हे भाग्य लाभते आणि त्यांच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी येतात तर काहींना यातील काहीच मिळत नाही. ‘बोनस’चा प्रयत्न या दोन्हींना एकत्र आणण्याचा आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 3:42 pm

Web Title: gashmir mahajani and pooja sawant upcoming marathi movie bonus ssv 92
Next Stories
1 वृद्ध दिग्दर्शकाने मला कपडे काढायला सांगितले, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
2 ‘मिसाईल मॅन’ अब्दुल कलामांवर बायोपिक, ‘हा’ अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका
3 Video : छपाकमुळे ‘त्या’ नराधमांना चांगली चपराक बसेल – कंगना रणौत
Just Now!
X