तरुणींच्या दिलाची धडकन वाढवणारा राजबिंडा, डॅशिंग हिरो पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे या हॅंडसम हिरोच्या वडिलांनीदेखील मराठी सिनेसृष्टीचा एक मोठा काळ गाजवला आहे. असे उमदा, देखणे अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी. यांचा सुपुत्र गश्मीर महाजनी ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत धमाकेदार पदार्पण करतोय. “नंदा आर्ट्स” आणि “वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्स” निर्मित ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमात गश्मीर प्रमुख भूमिकेत असणार आहे. मराठी मुलगा आणि कानडी मुलगी यांच्या लव्हस्टोरीला अॅक्शन सिक्वेन्सचा तडका दिलेला हा सिनेमा आहे. सिनेमाच दिग्दर्शन संजय लोंढे यांनी केल असून कौशल – मोझेस यांनी धाडसी दृश्य चित्रीत केली आहेत. आपल्या मुलाच्या पहिल्या सिनेमाबद्दल प्रेक्षकांप्रमाणेच रविंद्र महाजनी फार उत्सुक आहेत. २४ जुलैला हा सिनेमा महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रदर्शित होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 6, 2015 12:35 pm