01 December 2020

News Flash

गौहरने झैदसोबत केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ..

बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. या चर्चा ती संगीत दिग्दर्शक इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद दरबारला डेट करत असल्यामुळे सुरु झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच गौहर आणि झैद यांचा साखरपूडा झाला. आता त्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही डान्स करताना दिसत आहेत.

नुकताच ‘वुम्पला’ या इन्स्टाग्राम पेजने गौहर खान आणि झैद दरबारचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही अन्योख्या पद्धतीने इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

व्हिडीओमध्ये दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्या दोघांचा डान्स पाहण्यासारखा आहे. सध्या गौहर आणि झैदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी गौहरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत साखरपूडा झाल्याचे सांगितले होते. गौहर आणि झैद २५ डिसेंबरला लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. लग्नाच्या दोन दिवस आधी सर्व विधी करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच या लग्नसोहळ्यासाठी काही मोजक्याच लोकांना बोलवण्यात येणार असल्याचे म्हटले जाते.

कोण आहे झैद?
‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ यांसारख्या चित्रपटांना दमदार संगीत देणारे इस्माइल दरबार यांचा मुलगा झैद हा डान्सर आहे. सोशल मीडियावर झैदचे अनेक फॉलोअर्स असून तो आधी टिकटॉक स्टार होता. झैद आणि गौहर यांच्या वयात १२ वर्षांचं अंतर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 5:14 pm

Web Title: gauahar khan shown new dance style with zaid darbar avb 95
Next Stories
1 फिल्म सिटीमध्ये उभारला ‘जिगरबाज’ डॉक्टरांच्या हॉस्पिटलचा सेट
2 विकास दुबेचा एन्काऊंटर आता मोठ्या पडद्यावर; कुख्यात गुंडावर येतोय चित्रपट
3 VIDEO: उर्वशी ५५ लाखांचा ड्रेस घालून करत होती फोटोशूट; तेवढ्यात तोल गेला अन्…
Just Now!
X