अभिनेत्री गौहर खान येत्या २५ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे. संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा व कोरिओग्राफर झैद दरबारशी ती लग्नगाठ बांधणार आहे. गौहर झैदपेक्षा वयाने मोठी असून त्यांच्या वयातील अंतरावरून सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली. टीका करणाऱ्यांना गौहरने सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘इ टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गौहर म्हणाली, “झैद माझ्यापेक्षा वयाने लहान जरी असला तरी तो १२ वर्षांनी लहान नाहीये. आमच्या वयातील अंतराचा आकडा हा चुकीचा सांगितला जातोय. झैद त्याच्या वयाच्या मानाने फारच समजुतदार आहे. इतरांवर टीका करणं खूप सोपं आहे, पण त्यामुळे त्या जोडप्याच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. अर्थात आम्हाला या ट्रोलिंगमुळे काही फरक पडत नाही. आमचं नातं मजबूत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

आणखी वाचा : भावाच्या सल्ल्यामुळे मुंबईत आला होता जिमी; बॉलिवूडमध्ये स्वत:ची निर्माण केली ओळख

गौहरने मालिका व चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिने बिग बॉसच्या सातव्या पर्वाचं विजेतेपद पटकावलं होतं. तर झैदला नृत्याची फार आवड असून तो कोरिओग्राफर व डान्सर आहे. वडिलांप्रमाणे संगीतक्षेत्रात नशीब न आजमवता त्याने स्वत:ची वेगळी वाट निवडली.