बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी गौरी खानही सतत चर्चेत असते. ती प्रसिद्ध इंटीरिअर डिझायनर असून चित्रपट निर्माती आहे. गौरीने त्यांचा बंगला ‘मन्नत’ छान प्रकारे सजवला असून उद्योगपती मुकेश अंबानी, दिग्दर्शक करण जोहर, जॅकलीन फर्नांडिस, सिद्धार्थ मल्होत्रा यांसारख्या अनेक कलाकारांची घरे डिझाइन केली आहेत. आता गौरीने लॉकडाउनच्या काळात शाहरुख खानचे ऑफिस ‘रेड चिली’ डिझाइन केल्याचे समोर आले आहे.

गौरीने पती शाहरुखच्या ऑफिसमधील काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये गौरी सोफ्यावर बसली असल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने, ‘लॉकडाउनच्या काळात शाहरुखचे रेड चिली ऑफिस डिझाइन करणे एक अद्भूत अनुभव होता. या प्रोजेक्टसाठी मी वॉक्स इंडिया इंटीरिअर शिवाय कोणावर विश्वास ठेवू शकत नव्हते’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

लॉकडाउनच्या काळात गौरी खानकडे अनेक कामे होती. ती शाहरुखचे ऑफिस डिझाइन करण्यात व्यग्र होती. गौरीने तिचे दिल्लीमधील घर देखील स्वत: डिझाइन केले आहे. ते अनेकांनी पाहून गौरीची प्रशंसा देखील केली आहे.