News Flash

किंग खानचं घर सजवण्यासाठी गौरी खानने घेतली ही मेहनत, पाहा फोटो

गौरी खानने करण जोहरच्या मुलांची खोलीदेखील डिझाईन केली आहे

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची पत्नी म्हणजे गौरी खान. गौरी खान फक्त शाहरुखची पत्नी म्हणून ओळखली जात नाही तर ती एक उत्तम इंटीरिअर डिझायनरदेखील आहे. गौरी खान स्वत: इंटीरिअर डिझायनर असल्यामुळे तिने त्यांचा बंगला ‘मन्नत’ची सर्वांपेक्षा हटके आणि सुंदर अशी मांडणी केली आहे. नुकताच मन्नतच्या आतील फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहता सर्वजण भारावून गेले आहेत.

‘मन्नत’मधील फोटो लोकप्रिय मॅगझीन वोग (Vogue)मध्ये प्रकाशीत केले आहेत. वोग मॅगझीनच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या अंकात गौरी खानचे फोटो प्रदर्शित करण्यात आले आहे. तिचे हे फोटोशूट ‘मन्नत’ बंगल्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये केले आहे. गौरी या फोटोंमध्ये अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

यातील एका फोटोमध्ये गौरीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ‘मिड-डे’ने दिलेल्या वृत्तानुसार हे फोटोशूट ‘मन्नत’ बंगल्याच्या बालकनीमध्ये केले आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये गौरी घरातील तिच्या वॉर्डरॉबजवळ बसलेली दिसते. हा फोटो शेअर करत ‘कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने ही जागा सजवण्यासाठी हातभार लावला आहे’ असे लिहिले आहे.

दरम्यान ‘आमच्या घरात कोणतेही नियम नाहीत. माझी मुले शाळेतून घरी परततात तेव्हा मी घरीच असते. त्यांना मला पाहून आनंद होता आणि माझ्यासाठी हे फार महत्वाचे आहे’ असा खुलासा गौरीने एका मुलाखतीमध्ये केला आहे.

गौरी खानने बॉलिवूडचा दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या मुलांची खोलीदेखील डिझाईन केली आहे. तसेच वरुण धवन, रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या घरांचे डिझाईन देखील गौरी खानने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 4:52 pm

Web Title: gauri khan mannat photo viral on social media avb 95
Next Stories
1 काश्मीरवर आतिफ असलमचं वादग्रस्त वक्तव्य, भारतीयांचा संताप
2 ‘कबीर सिंग’मधील गाण्याविषयी अमृता फडणवीस म्हणतात..
3 Photo: संजय नार्वेकर ‘बिग बॉस’च्या घरात
Just Now!
X