News Flash

‘ही’ व्यक्ती दिल्लीवरुन कंट्रोल करते शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यामधील कामे

गौरी खानने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान चित्रीकरणासाठी बऱ्याच वेळा घरापासून दूर असतो. पण सध्या करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शाहरुख कुटुंबीयांसोबत मुंबईमधील ‘मन्नत’ बंगल्यामध्ये राहून वेळ घालवत होता. दरम्यान शाहरुखची पत्नी गौरी खानने एका मुलाखतीमध्ये शाहरुखशी आणि मन्नतशी संबंधीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

नुकतीच गौरी खानने NDTVला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गौरीने सांगितली की तिची आई दिल्लीमध्ये राहुन ‘मन्नत’मधील कामे सांभाळते. त्या मन्नतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत फोन कॉल आणि व्हॉट्सअॅपद्वारे सतत संपर्कात असतात. त्या घरातील साफ-सफाई आणि इतर कामेही त्या फोनद्वारे करुन घेतात. या सर्व कामांमध्ये त्या स्वत:ला व्यग्र ठेवतात जेणे करुन त्यांचा वेळ जाईल.

 

View this post on Instagram

 

Squeezing memories into one frame…

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

‘बऱ्याचवेळा माझी कामे माझी आई रिमोट कंट्रोलद्वारे करतात. त्या दिल्लीमध्ये राहतात. पण त्या तिकडे राहत असल्या तरी मन्नतमधील कामे करतात. व्हॉट्स अॅप कॉल आणि मेसेजद्वारे त्या घरात काम करणाऱ्या लोकांना कुठे साफ-सफाईची गरज आहे हे सर्व सांगत असतात. त्या दिल्लीमध्ये राहून सगळं काही कंट्रोल करतात. मी त्यांच्याकडून खूप काही शिकले’ असे गौरीने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 6:58 pm

Web Title: gauri khan reveals things at her home mannat are controlled by her mother from delhi avb 95
Next Stories
1 शूटिंगवर जायला उशीर होतोय; संतापलेल्या ‘रॉक’ने हातांनीच तोडला लोखंडी दरवाजा
2 ‘हे’ कपल दिसणार बिग बॉस १४मध्ये?
3 “अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन”; पायल घोषने दिली धमकी
Just Now!
X