बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जितका लोकप्रिय आहे. तितकीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी त्याच्या पत्नीला म्हणजेच गौरी खानला असल्याचं दिसून येतं. स्वत: एक व्यावसायिका असलेली गौरी कायमच प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असते. अलिकडेच गौरीने एक फोटो शेअर केला असून तिने तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
गौरीने २००७ मधील फोटो शेअर केला असून हा फोटो विक्रम चावला यांच्या लग्नातला असल्याचं दिसून येत आहे. या फोटोमध्ये गौरीने निळ्या रंगाचा प्रिंटेड स्कर्ट आणि टॉप घातल्याचं पाहायला मिळत आहे.
“मला हा लूक आठवतोय. २००७ची स्टाइल. माझं खरंच या लूकवर प्रेम आहे”, असं कॅप्शन गौरीने या फोटोला दिलं आहे. दरम्यान, गौरी सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. तर कधी ती तिच्या इंटेरिअर डिझायनिंगच्या कामाचेदेखील फोटो पोस्ट करत असते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 6, 2020 5:03 pm