बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या फोटोंमधून सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. परदेशात राहून पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी सुहाना पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण यावेळी या चर्चा सुहानेमुळे नाही तर तिची आई गौरी खानने शेअर केलेल्या फोटोमुळे सुरु झाल्या आहेत.

नुकताच शाहरुखची पत्नी गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुहाना अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिचा हा फोटो शेअर करत गौरीने ‘सुहानकडून घेते मेकअप टिप्स’ असे कॅप्शन दिले आहे. तर सुहानाने हा फोटो शेअर करत ‘एक्सपेरीमेंट’ असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

Learning…. make up tips @suhanakhan2 #indoor #activity ..

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

 

View this post on Instagram

 

Experimenting

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

गौरी खान आणि सुहानाने शेअर केलेला फोटो पाहून लॉकडाउनमध्ये मिळालेला मोकळा वेळ त्या कुटुंबीयांसोबत घालवत असल्याचे दिसत आहे. दोघीही मेकअपवर एक्सपेरीमेंट करत असल्याचे दिसत आहे. खास करुन सुहाना आईला मेकअप टिप्स देत असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

काही दिवसांपूर्वी सुहानाने मेकअप करुन फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती मेकअपवर वेगवेगळे एक्सपेरीमेंट करत असल्याचे दिसत आहे. तसेच तिने वेगवेगळे एक्सप्रेशन देखील दिले होते.