News Flash

काजल अगरवालच्या साखरपुड्याचा फोटो; होणाऱ्या पतीने केला पोस्ट

येत्या ३० ऑक्टोबर रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

काजल अगरवाल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री काजल अगरवाल आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. व्यावसायिक गौतम किचलूशी ती लग्नगाठ बांधणार असून त्याविषयीची घोषणा तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केली. येत्या ३० ऑक्टोबर रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडणार आहे. ऑगस्ट महिन्यात काजल आणि गौतमचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचा फोटो नुकताच गौतमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

गौतमने साखरपुड्याचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘या फोटोतही डिझाइनचा घटक प्रतिबिंबित होतो’, अशी कमेंट काजलने या फोटोवर केली. काही दिवसांपूर्वी काजलने लग्नाची घोषणा करताना सोशल मीडियावर लिहिलं, ‘मी हो म्हणाले. मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की मी ३० ऑक्टोबर २०२० रोजी गौतम किचलूशी लग्नगाठ बांधत आहे. मुंबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. आयुष्याचा हा नवीन प्रवास एकत्र सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तुमचं प्रेम आणि तुमच्या आशीर्वादासाठी खूप धन्यवाद.’

आणखी वाचा : ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत होणार ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एण्ट्री

काजलने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘मगधीरा’ हा तिच्या करिअरमधील उल्लेखनीय चित्रपट आहे. या चित्रपटाने दाक्षिणात्य बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती आणि काजलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता. २०११ मध्ये तिने ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगणसोबत काम केलं. त्यानंतर ती ‘स्पेशल २६’ या चित्रपटातही झळकली. यामध्ये तिने अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 12:52 pm

Web Title: gautam kitchlu shares engagement pic with kajal aggarwal ssv 92
Next Stories
1 धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्याला अटक; आर. माधवनने केली कठोर शिक्षेची मागणी
2 फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? आज आहे लोकप्रिय क्रिकेटपटूची पत्नी
3 “भावा असे करु नकोस, NCB घरी येईल”, शाहिदचा व्हिडीओपाहून नेटकऱ्यांची भन्नाट प्रतिक्रिया
Just Now!
X