देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा टप्पा १७ मे पर्यंत वाढवलेला आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस देशभरासह राज्यात अधिकच वाढत आहे. देशातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी पोलीस, डॉक्टर दिवस-रात्र काम करत आहेत. तर दुसरीकडे गरिब लोकांना आणि कामगारांना याचा चांगलाच फटका बसत असल्याचे दिसत आहे. अशातच अनेक कलाकार त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील इशा उर्फ गायत्री दातारने देखील अशा लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

एका सामाजिक संस्थेच्या मदतीने गायत्री गोरगरिबांची आणि गरजूंची सेवा करत आहे. पुणे महापालिकेच्या सहकार्याने ही सामाजिक संस्था बेघर आणि गरजू व्यक्तींना अन्न पुरवण्याचे काम करते. समाजकार्यात मदत होत असल्याने गायत्री आनंदी आहे.

Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
System for one vote of disabled person in remote village
लोकशाहीची खरी ताकद! दिव्यांग व्यक्तीच्या एका मतासाठी यंत्रणा दुर्गम गावात
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
Appointment of financial institution
विरार-बोळींजमधील घरांच्या विक्रीसाठी वित्तीय संस्थेची नियुक्ती

“लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मदतीची गरज आहे. सध्या शूटिंग बंद असल्यामुळे, माझ्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेचा योग्य वापर करायचा असे मी ठरवले. एका सामाजिक संस्थेला मदतकार्यासाठी मनुष्यबळाची गरज असल्याचे मला एका मित्राकडून कळले. समाजकार्यात मदत करण्याची संधी मिळत असल्यामुळे, त्यावर फार विचार केला नाही. मी मदत करण्याचा निर्णय घेतला. अन्नाचे पॅकिंग आणि वाटप या दोन्ही गोष्टींसाठी मदत करायला मी सुरुवात केली. या कामांची लाज बाळगावी असे मला अजिबात वाटत नाही. बिकट परिस्थितीत या कामामुळे मला सकारात्मक ऊर्जा मिळते” असे गायत्री म्हणाली.

मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, हे सांगायला सुद्धा गायत्री विसरली नाही. मानसिक आरोग्य हीसुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. लॉकडाऊनच्या काळात आपापले छंद जोपासून किंवा आवडते चित्रपट पाहून, संगीत ऐकून सर्वांनी नेहमी अनादी राहावे असा सल्ला गायत्रीने दिला आहे.