News Flash

‘डिलिव्हरी रूममध्ये असताना हरभजन काढत होता फोटो; पत्नी गीताने सांगितला किस्सा

गीताने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

गीताने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

माजी अभिनेत्री गीता बसरा आणि पती हरभजन सिंग यांनी १० जुलै रोजी त्यांच्या दुसऱ्या बाळाचे या जगात स्वागत केले. मात्र, गीता आणि हरभजन यांनी अजुनही त्यांच्या मुलाचे नाव काय आहे हे त्यांच्या चाहत्यांना सांगितले नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गीताने मुलाच्या जन्मावर तिच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती ते सांगितले आहे.

गीताने नुकतीच एक मुलाखत दिली. डिलिव्हरीच्या वेळी हरभजन सिंग काय करत होता, याचा किस्सा गीताने या मुलाखतीत सांगितला आहे. ‘हरभजन तिच्या सोबत डिलिव्हरी रूममध्ये होता आणि तो सतत फोटो काढत होता. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला आनंद झाला आणि तो नाचू लागला’, असे गीताने एका वृत्तवाहिनीला सांगितले.

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा

पुढे ती म्हणाली, “जेव्हा डिलीव्हरी होणार असे सांगण्यात आले, तेव्हा त्याने फोटो काढायला सुरुवात केली. त्याला मुलं खूप आवडतात. सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरच्या मुलांसोबत तो अजुनही खेळतो. बाळाला पाहिल्यानंतर तर त्याचा आनंद हा शिगेला पोहोचला. मी आणि हरभज आम्ही दोघं आमच्या मुलाला वेगवेगळ्या नावाने हाक मारतो. कधी छोटू तर कधी शेरा.”

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 10:10 am

Web Title: geeta basra says harbhajan singh was taking photos in delivery room during sons birth dcp 98
Next Stories
1 कान चित्रपट महोत्सव : तीन दशकांत प्रथमच दिग्दर्शिकेस पाम पुरस्कार
2 विक्की कौशलच्या या व्हिडीओवर दीपिका पादुकोणसह इतर सेलिब्रिटींना हसू आवरलं नाही
3 तमिळ अभिनेता सिद्धार्थला मृत घोषित केलं; तक्रार केल्यानंतर यूट्यूबने दिलं ‘हे’ विचित्र उत्तर
Just Now!
X