News Flash

‘तिचं’ पोस्टर पाहून हरभजनची विकेट पडली; पाहताच क्षणी पडला प्रेमात!

या लव्हस्टोरीची सध्या चर्चा

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्ससोबत लग्नगाठ बांधली आहे. यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री गीता बसरा. गीता बसराने भारतीय क्रिकेट संघाचा वेगवाग गोलंदाज हरभज सिंहसोबत संसार थाटला आहे. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर गीता आणि हरभजन लग्नबंधनात अडकले. 2015 ला दोघांचं लग्न झालं. लग्नाच्या ६ वर्षानंतर गीताने हरभजन आणि तिच्या प्रेम कहाणीचे काही किस्से शेअर केले आहेत.

दिल दिया है’, ‘द ट्रेन’ आणि ‘सेकेंड हैंड हसबैंड’ अशआ सिनेमांमधून गीता झळकली आहे. बॉलिवूड बबलला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गीता बसराने तिच्या लव्हस्टोरीचा खुलासा केलाय. ती म्हणाली, “द ट्रेन या माझ्या सिनेमाच्य़ा पोस्टरमध्ये पाहूनच हरभजनला मी आवडली होते. त्यानंतर हरभजनने माझ्याबद्दल विचारपूस करण्यास सुरूवात केली. ही मुलगी कोण आहे? कुठली आहे? हे जाणून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. तर दुसरीकडे मी क्रिकेट पाहत नसल्याने मला हरभजन सिंह कोण आहे? काय आहे? याबद्दल काहीच कल्पना नव्हती.” असं गीता म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

त्यानंतर गीता आणि हरभजनची ओळख झाली.. ते डेट करू लागले. आणि २९ ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांता विवाह झाला. तर २०१६ साला त्यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. त्यांच्या मुलीचं नाव हिनाया आहे. लंडनमध्ये हिनायाचा जन्म झाला. लवकरच गीता दुसऱ्यांदा आई होणार आहे.

इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत गीताने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी दिली होती. जुलैमध्ये ती आई होणार असं तिने या पोस्टमध्ये म्हंटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 2:03 pm

Web Title: geeta basra share lovestoy with harbhajan singh said he saw my poster and fall in love mpw 89
Next Stories
1 ‘चुलबुल पांडे’ला घरी घेऊन गेलो तर आई कानशिलात लगावेल, सलमान खानचा खुलासा
2 ‘मोदीजी पुढचे आणखी १० वर्ष पंतप्रधान रहावेत, कारण मला भक्तांना…’, अभिनेत्याचं देवाला साकडे
3 घराबाहेर लोकांना सरबत देताना दिसला सोनू सूद ; राखी सावंतच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया
Just Now!
X