News Flash

करोनाने आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री हिरावली ; अभिनेत्री गीता बहल यांचं निधन

प्रकृती बिघडल्याने व्हेंटिलेटर सपोर्टवर होत्या गीता बहल

करोनाने आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री हिरावली ; अभिनेत्री गीता बहल यांचं निधन

करोनाच्या महामारीने आणखी एका हरहुन्नरी अभिनेत्रीला काळाच्या पडद्याआड गेली आहे. ८० च्या दशकात अभिनेते ऋषी कपूर पासून ते शत्रुघ्न सिन्हा पर्यंत सगळ्याच अभिनेत्यांसोबत रूपेरी पडदा गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री गीता बहल यांचं करोनामुळे निधन झालंय. करोना पॉझिटीव्ह आल्यानंतर अभिनेत्री गीता बहल यांना १९ एप्रिल रोजी मुंबईतल्या जुहूमध्ये असलेल्या क्रिटीकेअर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर शनिवारी रात्री ९.४० मिनीटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

काही दिवसांपुर्वीच अभिनेत्री गीता बहल यांच्यासोबतच त्यांचे भाऊ रवि बहल, 85 वर्षीय आई आणि त्यांच्या घरात घरकाम करणारी बाई हे सगळे करोनाने संक्रमित झाले होते. या तिघांना त्यांच्या घरीच आयसोलेट करून घेतलं होतं. गेल्या ७ दिवसांपासून तिघांचीही प्रकृती स्थिरावत होती. परंतू अभिनेत्री गीता बहल यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानं २६ एप्रिल रोजी त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. दोन दिवसांपासून त्या व्हेंटिलेटर सपोर्टवर होत्या. ६४ वर्षाच्या अभिनेत्री गीता बहल या करोनाविरोधात सामना करत होत्या. मात्र त्यांची करोना विरोधातली झुंज अपयशी ठरली आणि शनिवारी रात्री ९.४० वाजता त्यांनी व्हेंटिलेटर सपोर्टवर असतानाच अखेरचा श्वास घेतला.

प्रकृती खालावल्याने रूग्णालयात केलं होतं दाखल
अभिनेत्री गीता बहल यांचे लहानपणीचे मित्र आणि अभिनेता-दिग्दर्शक आकाशदीप साबीर यांनी गीता बहल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “गीता यांच्या आई, भाऊ आणि घरकाम करणारी बाई हे तिघेही कोरोनातून बाहेर पडले, पंरूत गीता बहल यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून गीता बहल यांचा ऑक्सिजनची पातळी कमी-जास्त होत होता, अशा परिस्थितीत त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्याची वेळ आली, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनतरही अभिनेत्री गीता बहल यांना वाचवू शकले नाही आणि शनिवारी त्यांचं निधन झालं.”

या फिल्मधून केला होता डेब्यू
अभिनेत्री गीता बहल यांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज खोसला यांची गाजलेली फिल्म ‘तुलसी तेरे आंगन की’ (१९७८) मधून त्यांच्या करियरची सुरवात केली होती. या फिल्ममध्ये विनोद खन्ना, नूतन आणि आशा पारेख सारख्या दिग्गज कलाकारांच्या देखील भूमिका होत्या.

या चित्रपटांतही केले होते काम
८० वे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री गीता बहल यांनी ऋषि कपूर और मौशमी चटर्जी यांच्यासोबत ‘दो प्रेमी’ (१९८०), ‘जमाने को दिखाना है’ (१९८१), ‘मैंने जीना सीख लिया’ (१९८२), ‘मेरा दोस्त मेरा दुश्मन’ (१९८४), ‘नया सफर’ (१९८५) सारख्या हिंदी फिल्ममध्ये आपली अदाकारी दाखवली. याशिवाय गीता बहल यांनी गुजराती फिल्म ‘नसीब नू खेल’ (1982) आणि ‘यार गरीबा दा’ (1986) सारख्या पंजाबी चित्रपटांतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 1:19 pm

Web Title: geeta behl dies from covid she was on ventilator support prp 93
Next Stories
1 “फक्त आकडे….तिकडे मृत्युंचे तर इकडे जागांचे!” – स्वानंद किरकिरे यांचं ट्विट चर्चेत
2 “ऑक्सिजन नाहीये, मन की बात लावू का?”; शत्रुघ्न सिन्हा यांचा सरकारला टोला
3 महाराष्ट्राच्या मदतीला धावली देशाची ‘गानकोकिळा’ ; मुख्यमंत्री म्हणाले, “धन्यवाद!”
Just Now!
X