News Flash

रितेश-जेनेलियाचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण; प्लान्ट बेस्ड मीट प्रॉडक्शन करणार लाँच

जाणून घ्या, रितेश-जेनेलियाच्या नव्या कंपनीविषयी

करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सध्या लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात सारं काही बंद असल्यामुळे अनेक उद्योग-धंदे, व्यवसायही ठप्प झाले आहेत. यामध्येच अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी नव्या व्यवसायात पदार्पण करणार आहेत. या दोघांनीही मिळून प्लान्ट बेस्ड मीट प्रॉडक्शन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या रितेश-जेनेलियाच्या या नव्या प्रॉडक्शनची जोरदार चर्चा सुरु आहे.

रितेश आणि जेनेलियाने इमॅजीन मीट्स (Imagine Meats) या नावाने नव्या प्रॉडक्शनची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हा जरी मांसाहारी पदार्थ वाटत असला तरीदेखील प्रत्यक्षात तो मांसाहारी पदार्थ नसून शाकाहारी पदार्थ असतो. केवळ त्याला मांसाहारी पदार्थाचं रुप दिलं जातं. प्लान्ट बेस्ड मीट प्रॉडक्शनमध्ये पालेभाज्या किंवा अन्य शाकाहारी पदार्थ मांसाप्रमाणे भासतील या पद्धतीने तयार केले जातात.


दरम्यान, जवळपास एका वर्षापासून या प्रकल्पावर काम सुरु असून लवकरच हे प्रोडक्ट बाजारात उपलब्ध होणार असल्याचं रिेतेश- जेनेलियाने सांगितलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 2:59 pm

Web Title: genelia and riteish deshmukh announce plans to launch plant based meat products ssj 93
Next Stories
1 ‘काश्मीरियत’ शॉर्ट फिल्मचा फर्स्ट लूक प्रदर्शित!
2 महेश भट्ट यांचा लीक झालेला व्हिडीओ खरा आहे का?; ‘गंदी बात’ फेम अन्वेशीला पडला प्रश्न
3 आईच्या आठवणीमध्ये सोनू सूद झाला भावूक, शेअर केला फोटो
Just Now!
X