News Flash

फन अनलिमिटेड; देशमुख वहिनी जेनेलियाची कांचीसोबत धमाल

जेनेलियाचा हा फनी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

(Photo credit - genelia deshmukh instagram)

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, आता जेनेलियाने रितेशसोबत नाही तर कांची कौलसोबत एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

जेनेलियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत जेनेलिया कांची सोबत मज्जा करताना दिसत आहे. जेनेलियाच्या हाताला प्लास्टर असूनही ती मस्तीच्या मूडमध्ये असल्यावर कसा आनंद घेते हे त्या व्हिडीओतून दिसत आहे. जेनेलिया आणि कांची एका इंग्रजी गाण्यावर डान्स करत मस्ती करताना दिसत आहेत. हाताला प्लासटर असून ही जेनेलियाने उत्तम व्हिडीओ केल्याने नेटकरी तिची स्तुती करत आहेत. तर अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. जेनेलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी स्केटिंगचे धडे घेताना जेनेलिया पडली आणि तिच्या हाताला दुखापत झाली. जेनेलिया तिच्या मुलांसोबत स्केटिंगचे धडे घेत होती. तिला दुखापत कशी झाली याचा व्हिडीओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, तिने हा व्हिडीओ देखील ‘पावरी स्टाईल’मध्ये शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 1:18 pm

Web Title: genelia d souza deshmukh and kanchi kaul s funny video went viral dcp 98
Next Stories
1 ‘मेजर’ सिनेमातील सई मांजरेकरचा फर्स्ट लूक; क्यूट लूकवर चाहते फिदा
2 ‘मास्टर’चा रिमेक, सलमान साकारणार विजयची भूमिका?
3 कार्तिकसोबत काम केल्यानंतर अमृता सुभाष म्हणाली; त्याच्यासोबत काम करणं म्हणजे…
Just Now!
X