News Flash

‘रितेश ८ वेळा माझ्या पाया पडला होता’; जेनेलियाने सांगितला लग्नातील किस्सा

जेनेलियाने 'सुपर डान्सर चॅप्टर ४' मध्ये हा खुलासा केला आहे.

genelia deshmukh, riteish deshmukh,
जेनेलिया आणि रितेशच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि विनोदी व्हिडीओ शेअर करत ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडीओ रितेश किंवा जेनेलियाने शेअर केला नाही, तर ‘सुपर डान्स चॅप्टर ४’ च्या सेटवरील आहे. या व्हिडीओत जेनेलियाने खुलासा केला आहे की लग्नाच्या दिवशी रितेश तिचे आठ वेळा पाया पडला होता.

रितेश आणि जेनेलियाचा हा व्हिडीओ सोनी टीव्हीच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत त्या दोघांनीही ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मध्ये परिक्षक म्हणून हजेरी लावल्याचे दिसत आहे. ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ चा हा ‘शादी स्पेशल’ एपिसोड होता. यावेळी सगळ्या स्पर्धकांचे डान्स पाहत असताना जेनेलियाला तिच्या आणि रितेशच्या लग्नाची आठवण आली. ‘आज काल आपण लग्न जरी नव्या पद्धतीने करतो तरी मला पारंपारिक लग्न सोहळे आवडतात. मला आनंद आहे की माझं लग्न ही पारंपारिक पद्धतीने झालं. मी लग्न सोहळ्यात खूप रडले आणि हसले. एवढंच नाही तर रितेश माझे पाया पडला होता, असे जेनेलिया म्हणाली.

आणखी वाचा : रौप्य पदक विजेत्या मिराबाई चानू यांना जमिनीवर बसून जेवताना पाहून आर माधवन म्हणाला…

पुढे या विषयी सांगताना ती म्हणाली, “रितेश ८ वेळा माझे पाया पडला होता. ८ वेळा.” यावर रितेश हसत हसत म्हणाला, “मला असं वाटतं की जे ब्राह्मण होते त्यांना माहित होतं की मला लग्नानंतर काय करायचं आहे, त्यामुळे त्यांनी माझ्याकडून आधीच तयारी करून घेतली होती.”

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली होती. त्यानंतर शिल्पा ‘सुपर डान्स चॅप्टर ४’ मध्ये दिसली नाही. तर, तिच्या जागेवर प्रत्येक एपिसोडला एक नवीन कलाकार पाहुणा म्हणून हजेरी लावतो. तर यावेळी रितेश आणि जेनेलियाने हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2021 12:46 pm

Web Title: genelia deshmukh reveals riteish deshmukh touched her feet 8 times at their wedding dcp 98
टॅग : Entertainment
Next Stories
1 Friendship Day Special- जीव वाचवणाऱ्या मित्राचा किस्सा : नसीरुद्दीन शाह यांच्यावर झालेला वार ओम पुरींनी रोखला
2 ‘…म्हणून तुझ्या मुलांना शाप लागेल’, म्हणणाऱ्या नेटकऱ्याला लिसा हेडनचे उत्तर
3 शिल्पा शेट्टीला जबर फटका! ‘सुपर डान्सर’ ठरलं कोट्यावधी नुकसानीच कारण