News Flash

कमबॅकसाठी जेनेलिया तयार; ‘ही’ भूमिका करण्याची इच्छा

प्रेक्षकांच्या भेटीला येणार का जेनेलिया डिसुझा

कलाविश्वातील लय भारी जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख. या दोघांची सोशल मीडियावर कायमच चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतं. रितेशसोबत लग्न झाल्यापासून जेनेलियाचा अभियन क्षेत्रातील वावर कमी झाला आहे. लग्नानंतर तिने फार कमी चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, आता पुन्हा एकदा जेनेलियाला मोठा पडदा खुणावत असून तिने चित्रपटांमध्ये कमबॅक करण्याविषयी विचार सुरु केल्याचं सांगण्यात येत आहे. एका मुलाखतीत तिने चित्रपटात काम करण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे.

लग्नानंतर कलाविश्वातून ब्रेक घेत जेनेलिया तिच्या संसारात रममाण झाली होती. घर आणि मुले यांना ती जास्तीत जास्त वेळ देत होती. मात्र, आता तिने पुन्हा एकदा करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कदाचित येत्या काळात जेनेलिया पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

“लाइफ सेटल झाल्यानंतर कोणती गोष्ट कशी असावी याविषयी माझे विचार स्पष्ट होते. रितेश, माझी मुलं रियान व राहिल यांच्यासोबत मला जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता, त्यांच्यासोबत रहायचं होतं”, असं जेनेलिया म्हणाली.

पुढे ती म्हणते, “खरंतर घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना मी दुसरीकडे माझं कामदेखील मिस करत होते. मात्र, चित्रपटांच्या सेटवर लहान मुलांना घेऊन जाणं वगैरे या गोष्टी मला करायच्या नव्हत्या. मला माझं पूर्ण लक्ष कामाकडेच द्यायचं होतं. आता माझी मुलं बऱ्यापैकी मोठी झाली आहेत. त्यामुळे आता मी पुन्हा माझ्या कामाकडे वळू शकते. आता बॉलिवूडमधील काही भूमिका पाहून मला खरंच फार आनंद वाटतोय. त्यामुळे एखाद्या चांगल्या भूमिकेच्या मी प्रतिक्षेत आहे. तसंच जर मला एखाद्या आईची भूमिका मिळाली, तरीदेखील मी ती करण्यास उत्सुक असेन. ज्या भूमिकांसोबत मी स्वत: रिलेट करु शकेन त्या भूमिका मला करायला आवडतील”.

दरम्यान, बॉलिवूडमधील आदर्श जोडपं म्हणून जेनेलिया -रितेशकडे पाहिलं जातं. बऱ्याच वेळा हे दोघं सोशल मीडियावर एकमेकांची खिल्ली उडवताना दिसतात. त्याचप्रमाणे अनेक वेळा ते एकमेकांप्रतीचं प्रेमही व्यक्त करत असल्याचं दिसून येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 1:25 pm

Web Title: genelia deshmukhs comeback after a break for the family speaking about the role of mother ssj 93
Next Stories
1 VIDEO: महात्मा गांधींचं आवडतं भजन गाऊन लता मंगेशकर यांनी केलं अभिवादन
2 युपी पोलिसांनी राहुल गांधींवर केलेल्या लाठीचार्जवर स्वरा भास्कर संतापली, म्हणाली…
3 महात्मा गांधीजींनी पाहिलेला एकमेव सिनेमा कोणता, माहित आहे का?
Just Now!
X