News Flash

Video : जेनेलियाचा पाच वर्षांनंतर रॅम्पवर जलवा; रितेशही भारावला

सेलिब्रिटी जोडप्यांच्या यादीत चाहत्यांना नेहमीच कपल गोल्स देण्यासाठी काही जोड्यांच्या नावाला पसंती देण्यात येते. अशा या यादीत अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे, रितेश देखमुख आणि जेनेलिया

Genelia D'Souza
जेनेलिया डिसूझा देशमुख

सेलिब्रिटी जोडप्यांच्या यादीत चाहत्यांना नेहमीच कपल गोल्स देण्यासाठी काही जोड्यांच्या नावाला पसंती देण्यात येते. अशा या यादीत अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे, रितेश देखमुख आणि जेनेलिया डिसूझा. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही कलाविश्वांमध्ये या जोडीवर नेहमीच सर्वांच्या नजरा खिळतात. जेनेलियाने लग्नानंतर चित्रपटांतून ब्रेक घेतला आणि ती पूर्णपणे संसारात रमली. आता पाच वर्षांनंतर रॅम्प वॉकवर जेनेलियाचा जलवा पाहायला मिळाला. रॅम्पवर जेनेलियाला पाहून रितेशसुद्धा भारावून गेला होता.

फॅशन जगतामध्ये अनन्य साधारण महत्व असणाऱ्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये फॅशन डिझायनर सरोज जलोन यांनी डिझाइन केलेला लेहंगा परिधान करून जेनेलियाने रॅम्पवॉक केला. बोहो लूकमध्ये असलेल्या जेनेलियाने ऑक्सिडाइझ्ड दागिने परिधान केले होते. बोहो लूकला साजेसं असं जरीकाम केलेला जॅकेट तिने खांद्यावर घेतला होता. जेनेलिया आत्मविश्वासपूर्ण रॅम्प वॉक करताना रितेशची नजर तिच्यावरच खिळली होती.

आणखी वाचा : चाहतीच्या फॅशनसमोर फिकं पडलं दीपिकाचं सौंदर्य

लॅक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर दिशा पाटीलसाठी जेनेलिया व रितेशने मिळून रॅम्प वॉक केला होता. रॅम्पवरही या दोघांची केमिस्ट्री लक्ष वेधून घेत होती.

रितेश आणि जेनेलिया या दोघांनीही एकाच वेळी अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. ज्यानंतर बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विवाहबंधनात अडकल्यानंतर जेनेलियाने कलाविश्वातून काढता पाय घेतला, कुटुंबाकडे लक्ष देण्यास प्राधान्य दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 4:28 pm

Web Title: genelia dsouza graces the ramp walk after five years riteish deshmukh cheers for his wife watch video ssv 92
Next Stories
1 पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, पोलिसात तक्रार दाखल
2 अशी सुरु झाली अनुपम-किरण यांची लव्हस्टोरी
3 ‘ढगाला लागली…’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार हा मराठमोळा अभिनेता
Just Now!
X