News Flash

रितेश म्हणतो, ‘मी तुझ्यामध्ये माझा शोध घेतो, हॅप्पी अॅनिव्हर्सरी बायको’

रितेशला घट्ट अलिंगन दिल्याचा फोटो शेअर करत जेनेलियाने नाते घट्ट असल्याचे दाखवून दिले आहे.

रितेश आणि जेनेलिया

बॉलिवूडमधील गोड जोडपे म्हणून मराठमोळा रितेश देशमुख आणि बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा यांची जोडी सर्वांना नेहमीच आकर्षित करत असते. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून पहिल्यांदा बॉलिवूडच्या पडद्यावर झळकल्यानंतर या दोघांमध्ये प्रेम फुलले आणि पाच वर्षापूर्वी दोघे विवाहबंधनात अडकले होते. बॉलिवूडमधील गोड जोडपे आज लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करत आहे. लग्नाच्या वाढदिवसादिवशी त्यांचे लाखो चाहते त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. आयुष्यातील या आनंदी क्षणाच्या रितेश-जेनेलिया या दोघांनी एकमेकांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. जेनेलियाने रितेशला अलिंगन दिल्याचा एक फोटो शेअर करत दोघांमधील नाते पाच वर्षानंतरही घट्ट असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तिने जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये ती रितेशला घट्ट मिठी मारल्याचे दिसते. जेनेलियाने या फोटोसोबत एक सुंदर कॅप्शन देखील लिहिले आहे. मी तुझ्या सोबत नेहमीच सोबत राहिन, अशा शब्दात आपल्या पतीने दिलेल्या प्रेमाबद्दल जेनेलियाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रितेशने देखील स्वीट जेनेलियाला स्वीट संदेश दिला आहे. ट्विटर अकांऊटवरुन रितेशने लग्नाचा फोटो शेअर करत नात्यातील आनंदी क्षणाला पुन्हा एकदा उजाळा देण्याचा प्रयत्न केला. जेनेलियाने नाते घट्ट असल्याचा फोटो शेअर केल्यानंतर रितेशनेही जेनेलियाचे आपल्या आयुष्यात  महत्वाचे स्थान असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. मी तुझ्यामध्ये माझा शोध घेतो, जेनेलिया माझ्यासाठी विश्व असल्याच्या आशयाचा संदेश देत रितेशने पत्नी जेनेलियाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना मराठमोळा अंदाज  दाखवून देण्यासाठी जेनेलियाला बायको असे संबोधल्याचे दिसते.

रितेश आणि जेनेलिया बॉलीवूडमधील आवडती जोडी सोशल मीडियावर सक्रिय असते. रितेश-जेनेलिया जोडीच्या प्रेमाचे किस्से बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरते. काही दिवसांपूर्वी रितेशला जेव्हा त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल विचारले तेव्हा त्याने जेनेलिया हे त्याचे पहिले प्रेम नसून फोटोग्राफी हे त्याचे पहिले प्रेम असल्याचे सांगितले होते. जेनेलियाने त्याला एक कॅमेराही भेट म्हणून दिला होता आणि आपली आवड पुढे नेण्याचा सल्लाही दिला होता हे देखील त्याने स्पष्ट केले. आता जेनेलिया काही बोलणार आणि रितेश ऐकणार नाही असं तर होऊच शकत नाही ना.. रितेशने नंतर कॅमेऱ्याच्या तांत्रिक गोष्टी शिकवण्यासाठी एक खाजगी शिकवणीही लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 7:06 pm

Web Title: genelia dsouza wish for hubby ritesh deshmukh on their wedding anniversary
Next Stories
1 ‘पाकिस्तानने आपल्यासाठी दार उघडले, आता आपली वेळ’
2 ‘प्रियांकालाच विचारु तिला माझ्यापासून काय अडचण आहे’
3 फिल्मफेअरच्या प्रकरणावरून सोनमने केली भावाची पाठराखण
Just Now!
X