News Flash

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सवात ‘जर्मनीचा इलेव्हन ईयर्स’ सवरेत्कृष्ट

‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सवात जर्मनीचा इलेव्हन ईयर्स हा लघुपट सवरेत्कृष्ट ठरला,

‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सवात जर्मनीचा इलेव्हन ईयर्स हा लघुपट सवरेत्कृष्ट ठरला, तर कथानकात ‘भोपाल डायरीज’ या लघुपटाने बाजी मारली आणि ‘क्लासिक वे’ या लघुपटाने सामाजिक प्रबोधन या प्रवर्गात आपला ठसा उमटवला आहे. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, महाराष्ट्र शासनातर्फे या चित्रपट महोत्सवाचे आयोजन रवींद्र नाटय़ मंदिरात करण्यात आले होते फिल्ममेकिंगचे मार्गदर्शन करणारी ‘सिनेमॅटिक व्हिजन एंटरटेन्मेंट’ या संस्थेने फेस्टिवलचे संयोजन केले. या महोत्सवात जगभरातून तब्बल ५५० लघुपटांनी सहभाग घेतला होता. महोत्सवाचे उद्घाटन सुधीर नांदगावकर (संचालक, थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल) व अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक विकास देसाई , पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक आशुतोष घोरपडे यांच्या हस्ते पार पडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 2:05 am

Web Title: german film got best award in maharashtra international short film festival
Next Stories
1 सलमानच्या ‘सुलतान’चे पहिले पोस्टर प्रदर्शित
2 अक्षय आणि ह्रतिकच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर, कोण मारेल बाजी?
3 १०८ किलो वजन कमी करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज- सलमान खान
Just Now!
X