‘घाडगे & सून’ मालिकेत अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ती अक्षय- अमृताची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळाली. अक्षय-अमृता यांच्यातील सोनेरी क्षण सुंदर अशा रोमँटिक गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. घाडगे & सून मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे अक्षय- अमृताचं निखळ नातं. त्यांच्या याच नात्यातले काही निखळ क्षण या गाण्यामध्ये अतिशय सुंदररित्या टिपले आहेत. अक्षय-अमृतामधल्या जवळीकीचे कारण ठरलंय कियाराचं कारस्थान. हे गाणे शूट करताना या दोघांनी बरीच मज्जा मस्तीदेखील केली. हे सुंदर सुमधूर गाणे दिपाली साठे जिने ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटातील ‘ये कैसी जगह’ आणि अभय जोधपुरकर ज्याने ‘झिरो’ चित्रपटातील ‘मेरे नाम तू’ हे गाणे गायले आहे.

‘घाडगे & सून’ मालिकेत अक्षय आणि अमृताच्या नात्याला अनेक छटा आहेत. त्यांनी एकत्र मिळून घरावर आलेल्या संकटाचा सामना केला, प्रत्येक संकटात त्यांनी एकमेकांना खंबीर साथ दिली. दोघांचे लग्न गैरसमजुतीतून झाले, त्यामुळे त्यांच्यामध्ये भांडणं झाली, हळूहळू हे नातं मैत्रीत बदललं. हे सगळे होत असताना अमृता अक्षयच्या प्रेमात कधी पडली हे तिलादेखील कळले नाही.

Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

वाचा : ‘तुला पाहते रे’ मालिका महिन्याभरात घेणार प्रेक्षकांचा निरोप

आता मालिकेमध्ये अक्षय आणि अमृताच्या नात्याची कसोटी लागणार आहे. कारण कियाराच्या कट कारस्थानांपासून घाडगे सदनला वाचविण्यासाठी अक्षय कियारासोबत दुबईला कायमचा निघून जाणार आहे आणि तिकडे जाण्याआधी त्याने अमृताला एक संध्याकाळ एकत्र राहण्याची मागणी केली. अक्षय आणि अमृताने अनेक आठवणी यावेळेस एकमेकांन सांगितल्या, हे खास क्षण ‘घाडगे & सून’ मालिकेमध्ये रोमँटिक गाण्यातून दाखविण्यात आले. घाडगे & सून मालिकेमध्ये आता पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.