News Flash

दिवाळीच्या निमित्ताने ‘घाडगे & सून’, ‘हे मन बावरे’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकांमध्ये घडणार या घडामोडी

कलर्स मराठी वाहिनीवर संध्याकाळी सात वाजल्यापासून हे दीपावली विशेष भाग प्रसारित होणार आहेत.

‘घाडगे & सून’ मालिकेमध्ये दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अक्षय आणि कियारा घाडगे सदनमध्ये येणार आहेत. काही दिवसांपासून मालिकेमध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत. अक्षयच्या मनात अमृताविषयी प्रेमाची भावना येऊ लागली आहे. अक्षय आणि कियाराचा हा पहिला पाडवा असल्याने घाडगे सदनमध्ये तो देखील साजरा केला जाणारा आहे. परंतु हे होत असताना अमृता जरा नाराज आहे कारण तिला मागील वर्षाच्या पाडव्याची आठवण आणि इतर सगळ्याच गोष्टी आठवणार आहेत. माई आणि अण्णांनी अक्षयला माफ केले असून आता हे दोघे देखील घाडगे परिवारासोबत राहणार आहेत. अक्षय परत घाडगे सदनमध्ये परतल्यामुळे अमृताचे आव्हान पूर्ण झाले आहे. अक्षय आणि कियारा आता घरी परतल्यावर अमृता घाडगे सदनमध्ये रहाणार का, पुढे मालिकेत कुठले नवे वळण येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेतसुद्धा दिवाळी साजरी होणार आहे. संयोगीता आणि सिध्दार्थची भाऊबीज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तसेच दिवाळीच्या निमित्ताने सिद्धार्थ पहिल्यांदा अनुच्या घरी जाणार आहे. तर ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमध्ये प्रेम आणि राधा मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करणार आहेत. दीपिका राधा आणि देशमुख – निंबाळकर कुटुंबाला बऱ्याच गोष्टी बोलून जाणार आहे. नक्की दीपिकाच्या मनात काय आहे, कुठलं नवं कारस्थान ती राधा – प्रेमच्या विरोधात रचणार आहे, राधा या संकटावर कशी मात करेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेमध्ये मिळणार आहे.

Video : ..तर सलमानला मी बोटीतून ढकलून देईन- आमिर

कलर्स मराठी वाहिनीवर संध्याकाळी सात वाजल्यापासून हे दीपावली विशेष भाग प्रसारित होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 6:38 pm

Web Title: ghadge suun sukhachya sarini he man baware marathi serials diwali special episode
Next Stories
1 ‘सेक्रेड गेम्स’च्या चित्रीकरणाला सुरूवात
2 Video : ..तर सलमानला मी बोटीतून ढकलून देईन- आमिर
3 अक्षयच्या पदरात तीन मोठे चित्रपट, ‘मिशन मंगल’मध्ये प्रमुख भूमिकेत
Just Now!
X