News Flash

७ वर्षाच्या मुलासोबत अभिनेत्रीने शेअर केला न्यूड फोटो; कोर्टाने सुनावली कारावासाची शिक्षा

अभिनेत्रीला ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा

घाना मधील एका अभिनेत्रीला मुलाच्या सातव्या वाढदिवसा निमित्ताने फोटो शेअर करणं महागात पडलं आहे. या अभिनेत्रीने मुलासोबतचा न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने तिला स्थानिक न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

अभिनेत्री रोझमोंड ब्राऊन हिने 2020 सालात मुलाच्या सातव्या वाढदिवसा निमित्ताने एक फोटो शेअर केला होता. रोजमोंडने मुलासोबत न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने मोठी चर्चा रंगली. घानामध्ये रोझमोंडला अकुपेम पोलू या नावेने देखील ओळखलं जातं. रोझमोंडने मुलासोबत शेअर केलेल्या न्यूड फोटोमुळे मोठा वाद पेटला होता.

स्थानिक न्यायालयातील जज क्रिस्टिना यांनी सोशल मीडियावर मुलांसोबत न्यूड फोटो टाकणाऱ्या ट्रेंडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “फोटो शेअर करण्याआधी महिलेने मुलाची परवानगी घेतली होती का ? या महिलेने मुलाच्या खासगी गोष्टींचा सन्मान केला का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  त्या म्हणाल्या “नक्कीच या सर्वांचा विचार केलेला नाही”. यासोबतच जज क्रिस्टिना म्हणाल्या, “यात काही शंका नाही की महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. तसचं अश्लिल साहित्यातही वाढ झाली आहे. शिवाय अशा प्रकारच्या कृत्यांमुळे आई- मुलाचे नातेसंबध बिघडू लागली आहेत. ” असं त्या म्हणाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rosemond Alade Brown (@akuapem_poloo)

या सुनावणी दरम्यान जज क्रिस्टिनी यांना रोझमोंड एक सिंगल मदर म्हणजेच एकट्याच मुलाची जबादारी सांभाळत असून तिला कृत्याचा पश्चाताप झाल्याचं लक्षात आलं. मात्र तरिही समाजात एक संदेश पोहचावा या हेतूने शिक्षा होणं गरजेचं असल्याचं म्हणत त्यांनी अभिनेत्रीला तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.

वाचा: “व्हिडीओ शूट करताना मुलांना कुठे ठेवतेस?”; महिलेला अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

कोर्टाच्या या निर्णयावर अनेक देशांमधून संताप व्यक्त होतोय. तर सोशल मीडियावरूनही कोर्टाच्या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शवला. अमेरिकन रॅपर कार्डी बीने देखील अभिनेत्रीला पाठिंबा दिला. अमेरिकेत अशाप्रकारचे फोटशूट होत असल्याचं तिने म्हंटलं आहे. कारवास ही खूप मोठी शिक्षा असल्याचं म्हंटलं. ही शिक्षा सुनावल्यानंतर रोझमोंडचे वकील पुन्हा एकदा वरच्या कोर्टात याचिका दाखल करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 7:38 pm

Web Title: ghana actress rosemond alade brown share nude photo on son birthday jailed for three months kpw 89
Next Stories
1 आधी लगीन पिंपळाशी मग अभिषेकशी, लग्नाआधी ऐश्वर्याने केले का हे विधी?
2 “मी राजकारणात येण्याने त्यांचं दुःख कसं कमी होईल?” सोनिया गांधीबद्दल बोलले होते अमिताभ बच्चन
3 वाढत्या लोकसंख्येवरील ट्विटमुळे कंगना आणि कॉमेडियन सलोनीमध्ये जुंपली!
Just Now!
X