24 September 2020

News Flash

फ्लॅशबॅक : या ‘घर’ची गोष्टच वेगळी…

सिनेमाचा आनंद घेऊन ते घरी जायला निघतात.

dilip thakurलग्नानंतर सुखी संसारात रमलेले व नवीन स्वप्ने पाहणारे ते जोडपे चित्रपटगृहात रात्रीचा शेवटच्या खेळाला जाते, सिनेमाचा आनंद घेऊन ते घरी जायला निघतात. पण रात्रौ उशीर झाल्याने त्याना टॅक्सी वा रिक्षा मिळत नाही. म्हणून ते चालत चालतच घरी जायचा निर्णय घेतात. हसत खेळतपणे काही पावले गेल्यावर त्यांच्या दुर्दैवाने ७…८ जणांचे गुंडाचे टोळके त्यांची वाट अडवते. पतीला ( विनोद मेहरा ) ते अक्षरशः बेदम मारहाण करतात. आणि त्याच्या समोरच त्याच्या पत्नीवर ( रेखा ) जबरदस्ती करतात. या अनपेक्षित आघाताने ती मानसिक व भावनिकदृष्ट्या उध्वस्त होते. तिचा पती त्यातून तिला पुन्हा उभे राहण्यासाठी खूप खूप मदत करतो….. माणिक चटर्जी दिग्दर्शित ‘घर’ (१९७९) या चित्रपटाचे हे कथासूत्र. आज महिलांवरील बलात्काराच्या दुर्दैवी बातम्या रोजच घडतात. त्यातून दुर्दैवी स्त्री कशी व केव्हा उभी राहू शकते अथवा नाही याचे बरेचदा उत्तरच मिळत नाही. याचमुळे या ‘घर’ चित्रपटाची दखल महत्वाची ठरते. चित्रपटात नायिकेवर बलात्कार हा प्रकार नवा नाही. अनेकदा तर सवंगपणे वा विकृतपणे त्याचे सादरीकरण होते. तसाच हेतू असतो. म्हणून तर एखादा ‘घर’ येतो तेव्हा तो खूपच वेगळा ठरतो. विचार करायला लावतो. काहीसा अस्वस्थ करतो. निर्माता एन. एन. सिप्पी यानी व्यावसायिक भान ठेऊन हा चित्रपट निर्माण केला हे महत्वाचे. रेखामध्ये अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेत्री आहे याचा खरे तर याच चित्रपटाने सर्वप्रथम प्रत्यय दिला. ह्रषिकेश मुखर्जींचा ‘खुबसुरत’ याच वेळचा. त्यात खेळकर खोडकर रेखाचे दर्शन घडले. ‘घर’मधील गुलज़ार यांची गीते व राहुल देव बर्मनचे संगीत याचा खास उल्लेख हवाच. ‘आजकल पाव जमी पे नही पडते मेरे’, ‘फिर वही रात है’, ‘आपकी आखों मे कुछ…’ आजही ऐकावीत तोच “गुड फिल ” येतो. चांगल्या विषयाची अभिनय, गीत, संगीतासह प्रभावी मांडणी हे ‘घर’चे विशेष. पण त्यातला आशय सर्वकालीन आहे हे अधिकच महत्वाचे. …अशा दुर्दैवी स्त्रीला नुसती सहानुभुती नको तर मानसिक भावनिक आधार हवा…
दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:05 am

Web Title: ghar movie rekha vinod mehra
Next Stories
1 ‘सैराट’मधील ‘आर्ची’चा नवा लूक व्हायरल!
2 VIDEO: ‘रामन राघव २.०’ चित्रपटातून वगळण्यात आलेला ‘तो’ सीन प्रदर्शित
3 पुढच्या चित्रपटासाठी आलियाचा जीममध्ये हार्ड वर्कआऊट
Just Now!
X