08 March 2021

News Flash

Photo : ‘मणिकर्णिका’च्या मुख्य सेनापतीची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

काही दिवसापूर्वी या चित्रपटातील अंकिताचा लूक समोर आला होता.

बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौतचा बहुचर्चित ठरत असलेला ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यात कंगना राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारत आहे. या चित्रपटामध्ये कंगना व्यतिरिक्त अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता डॅनी डेन्झोप्पादेखील झळकणार आहेत. यात डॅनी यांच्या भूमिकेवरील पडदा उचलण्यात आला असून त्यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

डॅनी यांनी या चित्रपटामध्ये गुलाम गौस खान यांची भूमिका वठविली असून गुलाम गौस खान हे राणी लक्ष्मीबाई यांचे मुख्य सेनापती होती. प्रदर्शित झालेल्या फोटोमध्ये डॅनी एका योद्धाच्या रुपात दिसत असून ते घोडेस्वारी करताना दिसत आहेत.

दरम्यान, काही दिवसापूर्वी या चित्रपटातील अंकिताचा लूक समोर आला होता. या चित्रपटात अंकिताने झलकारी बाईची भूमिका वठविली आहे. तिचा लूक पाहता प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली होती. त्यात आता डॅनी यांचा लूकही समोर आला आहे.

मध्यंतरी डॅनी बायोस्कोपवाला या चित्रपटात झळकले होते. त्यानंतर त्यांनी मोठ्या पडद्यापासून फारकत घेतली होती. मात्र आता ते मणिकर्णिकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटानंतर ते बॅटल ऑफ सारागढ़ीमध्येही झळकणार आहेत. या चित्रपटामध्ये त्यांनी अफगान सरदारची भूमिका वठविली आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 1:36 pm

Web Title: ghulam ghaus khan in manikarnika the queen of jhansi first look out
Next Stories
1 दीप-वीरच्या लग्नापेक्षाही ‘या’ जोडीच्या लग्नाची गुगलवर चर्चा
2 Me Too: अटकपूर्व जामीनसाठी आलोक नाथांची दिंडोशी न्यायालयात धाव
3 Photo : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी
Just Now!
X