27 February 2021

News Flash

मुलगा की मुलगी? करीनाच्या घरी पोहोचले गिफ्ट्स

करीनाच्या घरी आलेल्या गिफ्टवरुन तिला मुलगा होणार की मुलगी असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. करीनाच्या बाळाचे स्वागत करण्यासाठी चाहते फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. करीनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु होत्या. पण करीनाने शेअर केलेल्या पोस्टनंतर करीना घरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता करीनाच्या घरी काही गिफ्ट पोहोचले आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

करीनाच्या डिलीवरीपूर्वीच तिच्या बाळासाठी अनेक गिफ्ट्स आले आहेत. करीना कपूरच्या फॅन पेजवर या गिफ्ट्सचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. तसेच सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर गिफ्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये गुलाबी आणि निळ्या रंगाच्या कागदामध्ये गिफ्ट्स पॅक केलेले दिसत आहेत. त्यामुळे करीनाला मुलगा होणार की मुलगी? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा- …म्हणून दिया मिर्झाने लग्नात कन्यादान करु दिलं नाही

काही दिवसांपूर्वी करीनाची नणंद आणि सैफ अली खानची बहिण सबा अली खानने करीनाच्या डिलीवरीशीसंबंधीत एक हिंट देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सैफ आणि त्याचा मुलगा इब्राहिमचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने, ‘तुम्ही ओळखू शकता… हा मुलगा कोण आहे? याचे उत्तर खाली कमेंटमध्ये द्या’ असे कॅप्शन दिले होते. हा फोटो सैफ आणि त्याचा मुलगा इब्राहिमचा असला तरी चाहते कमेंटमध्ये करीनाच्या डिलीवरीसंबंधीत प्रश्न विचारताना दिसत होते. एका नेटकऱ्याने यावर कमेंट करत विचारले, ‘करीनाने मुलाला जन्म दिला आहे का?’ तर दुसऱ्या एका युजरने ‘परत मुलगा झाला का?’ अशा कमेंट केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 10:53 am

Web Title: gifts arrive at kareena kapoor khan residence ahead of her baby arrival avb 95
Next Stories
1 …म्हणून दिया मिर्झाने लग्नात कन्यादान करु दिलं नाही
2 नाटय़ परिषदेवर अध्यक्षपदाचे ‘नवनाटय़’
3 ‘माझं आणि नुसरतचं लग्न झालेलं नाही’, ‘त्या’ प्रश्नावर यश दासगुप्ताचं उत्तर
Just Now!
X