News Flash

सलमानच्या ‘तेरे बिना’ गाण्यातील लहान मुलगी आहे तरी कोण?

जाणून घ्या त्या मुलीबद्दल

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे ‘तेरे बिना’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यामध्ये सलमानसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दिसत आहे. गाण्यातील त्यांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. भाईजानने हे गाणे यूट्यूबवर शेअर करताच काही तासांमध्येच ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. पण गाण्याच्या शेवटी एक लहान मुलगी दिसते आहे. ही मुलगी आहे तरी कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सलमान सध्या लॉकडाउनमुळे त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर आहे. तेथे तो अभिनेत्री जॅकलिन आणि वलूशा डिसूज़ा यांच्यासोबत वेळ घालवताना दिसत आहे. तसेच त्याने याच फार्महाऊसवर ‘तेरे बिना’ हे गाणे शूट केले आहे. ‘क्यु माने ना क्यु जाने ना, तेरे बिना कही मेरा जिया लागे ना’ असे या गाण्याचे बोल आहेत. सुधीर एहमद याने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. स्वत: सलमानने हे गाणे गायले आहे. तसेच गाण्याच्या व्हिडीओचे दिग्दर्शनही स्वत: सलमाने केले आहे.

सलमानच्या या व्हिडीओमध्ये शेवटी दिसणारी लहान मुलगी वलूशा डिसूज़ाची मुलगी असल्याचे म्हटले जात आहे. वलुशाने अभिनेता मार्क रॉबिनसनशी २००२मध्ये लग्न केले होते. त्या दोघांना तिन मुले आहेत. त्यांची नावे शनेल रॉबिनसन, ब्रुकलिन रॉबिनसन आणि सिएना रॉबिनसन आहेत. पण २०१३मध्ये वलुशाने घटस्फोट घेतला. वलुशा ही सलमानच्या वांद्रे येथील घराजवळ राहते. तसेत सलमान आणि तिच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 11:32 am

Web Title: girl who plays the role of salman khan and jacqueline fernandez daughter in tere bina music video avb 95
Next Stories
1 ‘तेरे बिना’मध्ये झळकलेली ‘ही’ चिमुकली आहे तरी कोण? नेटकऱ्यांना पडला प्रश्न
2 मिळालेला वेळ सकारात्मक गोष्टींसाठी घालवा – अक्षया देवधर
3 “पायी प्रवास करणाऱ्यांना आत्मनिर्भर म्हणायचं की लाचार?”, विशालचा मोदींना सवाल
Just Now!
X