News Flash

उपेंद्र सिधये यांचे ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण

उपेंद्र सिधये यांनी ‘मुंबई मेरी जान’ पासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती

हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी पटकथा आणि संवाद लिहिणारे उपेंद्र सिधये ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. “निर्मात्यांच्या प्रोत्साहनातून ‘गर्लफ्रेंड’ ही कलाकृती तयार होऊ शकली”, असे मत त्यांनी चित्रपटाविषयी बोलताना व्यक्त केले. अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उपेंद्र सिधये यांनी ‘मुंबई मेरी जान’ पासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करत, ‘द्रीष्यम्’, ‘किल्ला’, ‘मांजा’ अशा लोकप्रिय आणि विविध धाटणीच्या चित्रपटांसाठी पटकथा व संवाद लेखन केले.

ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात गर्लफ्रेंड शोधणाऱ्या मुलाच्या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच अभिनेता अमेय वाघचे नाव निश्चित झाले होते, नंतर अलिशा या गर्लफ्रेंडचे पात्र ताकदीने पेलू शकेल अशा अभिनेत्रीची निवड करण्याची वेळ आली, तेव्हा नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे नाव निश्चित करण्यात आले. असा हटके विषय असलेला ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट येत्या २६ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. टीझरला अमेय वाघचा आवाज देण्यात आला आहे. या टीझरमध्ये सई ताम्हणकर मस्ती करताना दिसत आहे. या चित्रपटाद्वारे अमेय वाघ आणि सई ताम्हणकर ही जोडी प्रथमच एकत्र काम करणार आहे. तर चित्रपटाची निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटीस, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवाला करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 7:08 pm

Web Title: girlfriend movie marks upendra sidhaye directorial debut
Next Stories
1 विश्वचषकातील सामना पाहण्यासाठी करिना आणि सैफ इंग्लंडला
2 भारतच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी शाहरुखला आमंत्रण?
3 दक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये ‘थलायवा’ रजनीकांतच सर्वाधिक लोकप्रिय
Just Now!
X