28 February 2021

News Flash

Video : बंदिस्त पिंजरा तोडून ‘गर्ल्स’ आल्या सर्वांसमोर

येत्या २९ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या, विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘गर्ल्स’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘गर्ल्स’ हा या वर्षातला बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. ‘गर्ल्स’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. चित्रपटाचे पोस्टर पाहून संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी चांगलेच संतापले होते. फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांनी या पोस्टरचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मती, रुमी, मॅगी या तीन वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या मुली, त्यांचे दैनंदिन आयुष्य जगत असताना एका वळणावर जेव्हा त्या एकत्र येतात तेव्हा, त्या तिघींची एकमेकींशी होणारी ओळख, आयुष्याकडे बघण्याची नव्याने मिळालेली नजर, नवीन विचार, नातेसंबंध आणि मुख्य म्हणजे त्यांची होणारी घट्ट मैत्री. या गोष्टीवर भाष्य करणारा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारा आहे. ‘दोस्तीत कधी मतलबी व्हायचे नसते, तर त्या दोस्तीचा मतलब शोधायचा असतो’ या संवादातूनच मैत्रीचा खरा अर्थ सांगणाऱ्या या चित्रपटातून माणसाच्या जीवनात असणाऱ्या प्रत्येक नातेसंबंधावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

हा चित्रपट पाहून आपली आपल्याच आई वडिलांशी नव्याने ओळख होणार आहे. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारे दिग्दर्शक विशाल देवरुखकर आपल्या हॅट्रिक असणाऱ्या चित्रपटातून मुलींच्या खासगी आणि बंदिस्त आयुष्याला सर्वांसमोर आणले आहे. आतापर्यंत मुलींमध्ये होणारे संभाषण, संवाद फारसे कोणाला माहित नव्हते पण आता ‘गर्ल्स’ पाहिल्यानंतर हे ‘गर्ल्स टॉक’ तुम्हाला नक्कीच कळतील.

या चित्रपटात अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर, देविका दफ्तारदार, पार्थ भालेराव, अतुल काळे, अमोल देशमुख, सुलभा आर्या, किशोरी अंबिये यांच्या व्यतिरिक्त अनेक कलाकार दिसणार आहेत. येत्या २९ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 12:15 pm

Web Title: girls movie trailer is out avb 95
Next Stories
1 Good News: लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर
2 मुन्नीनंतर आता होणार ‘मुन्ना बदनाम’; पाहा व्हिडीओ
3 ‘शोले’मध्ये गब्बरच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्याला होती पहिली पसंती
Just Now!
X