News Flash

ग्लॅमगप्पा : अनुष्का मस्तीच्या मूडमध्ये

फिलुरी फेम अनुष्का सध्या मस्तीच्या मूडमध्ये आहे. सोशल माध्यमांवर हॅशटॅग टाकून ती सर्वाची मस्करी करतेय.

फिलुरी फेम अनुष्का सध्या मस्तीच्या मूडमध्ये आहे. सोशल माध्यमांवर हॅशटॅग टाकून ती सर्वाची मस्करी करतेय. आपल्या फिल्मच्याच प्रमोशनचा भाग म्हणून तिने चक्क कॅटच्या फेवरेट आयटम साँगमधल्या चुका काढल्या आहेत. अनुष्का म्हणते ‘माय नेम इज शीला’ हे गाणंच चुकीचंय. या गाण्यातली चूक म्हणजे तिचं नाव शीला नाहीच आहे. तिच नाव आहे. कतरिना कैफ आणि मी तिला चांगलीच ओळखते. पुढे तिने हॅशटॅग जोडून म्हटलंय ‘शशी वॉज देअर’. शशी हे तिच्या फिलुरीमधील भूमिकेचं नाव आहे जी भूत असते. ती ठिकठिकाणी अदृश्य स्वरूपात असते. कॅटसोबतही शशी अदृश्य स्वरूपात होती, असं अनुष्काला म्हणायचंय!

‘रिअल लाइफ’मधला हिरो

काल मसक्कली तिच्या लाडक्या मैत्रिणीच्या बर्थडे बॅशला गेलेली. अर्थातच अनेक बॉलीवूडतारकांनी तिथे हजेरी लावली होती. या चमचमत्या सिताऱ्यांच्या भाऊगर्दीत बॉलीवूडच्या किंगखानचे आगमन झाले. लगेचच छायाचित्रकार त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पुढे सरसावले. पण तेव्हाच एक घटना घडली. एका छायाचित्रकाराच्या लक्षातच आले नाही की शाहरुखची गाडी समोरून येत आहे! त्या गर्दीत ती गाडी त्याच्या पायावरून गेली. शाहरुखच्या हे लक्षात येताच तो लगेच गाडीतून उतरला. त्या छायाचित्रकाराला त्याने स्वत: गाडीत बसवून रुग्णालयात नेले. त्याच्यावर उपचार केले. त्याला दिलासा दिला व त्याचा उपचारांचा सारा खर्च उचलला. मसक्कलीही तेव्हा त्याच्या सोबतच होती. मसक्कलीला वाटून गेलं खरंच शाहरुख रिअल लाइफमधला पण हिरो आहे!

-मसक्कली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 12:46 am

Web Title: glam gappa anushka sharma shah rukh khan
Next Stories
1 हा आहे सोफिया हयातचा भावी वर…
2 कुणाल कपूरचे ‘बॉडी ट्रांसफॉर्मेशन’ पाहिले का?
3 वेब सिरिजमध्ये दिसेल राम कपूर, साक्षी तन्वरची हिट जोडी
Just Now!
X