20 November 2017

News Flash

मी सिंगल!

मसक्कली सोनाक्षीच्या जवळ गेली तेव्हा सोनाक्षी जणू हवेतच तरंगत होती.

-मसक्कली | Updated: March 21, 2017 3:31 AM

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ची सक्सेस पार्टी सुरू होती. ड्रिंक सेशन सुरू झालं आणि अचानक एका आवाजाने मसक्कलीसह सर्वाचे लक्ष वेधले. तो आवाज सोनाक्षीचा होता. ती मोठमोठय़ाने सर्वाना ओरडून सांगत होती की, मी ‘सिंगल’ आहे. सर्वच जण सोनाक्षीच्या या कृत्याने अवाक्  झाले. हिला अचानक काय झालं, असा सर्वानाच प्रश्न पडला! मसक्कली सोनाक्षीच्या जवळ गेली तेव्हा सोनाक्षी जणू हवेतच तरंगत होती. मद्याचे अनेक ग्लास रिचवल्याचा हा परिणाम असल्याचं मसक्कलीला जाणवलं. मसक्कलीने तिला शांत केलं. तेव्हा मसक्कलीसमोर मन मोकळं करत सोनाक्षीने तिचा बॉयफ्रेंड बंटी साजदेहसोबत ब्रेकअप झाल्याची कबुली दिली. या घटनेनंतर या बाईसाहेबांचं खरंच ब्रेकअप झालंय की हे सर्व पब्लिसिटी स्टंटसाठी चाल्लंय, असा प्रश्न मसक्कलीला सारखा सतावत होता.

विद्या भडकली

विद्या बालन सध्या सर्व प्रश्नकर्त्यांवर जाम भडकलेली आहे. त्याचं कारणच तसं आहे. जो तो उठतो तो विद्याला ‘आता पेढे कधी?’ असा प्रश्न विचारतो. मीडियानेपण विद्यावर याच प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा तिचा पाराच चढला. मी काय मुलांना जन्म देणारी मशीन आहे का, असा प्रतिसवाल तिने केलाय. प्रेग्नसी हा माझा वैयक्तिक विषय असून यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही, असेही तिने सुनावले आहे. विद्या तिच्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहेच, पण नको त्या प्रश्नांना आपल्या सडेतोड उत्तराने फटकावून मसक्कलीच्या मनात तिने एक वेगळं स्थान निर्माण केलंय!

-मसक्कली

First Published on March 21, 2017 3:31 am

Web Title: glam gappa bollywood news sonakshi sinha vidya balan