News Flash

‘सेक्स अॅण्ड डेमन’ चित्रपटाच्या नायिकांचे ग्लॅमरस फोटो शूट

सध्या थरारक आणि भयपटांचा बोलबोला आहे. स्पेशल इफेक्टच्या करामतीमुळे या प्रकारातील चित्रपट अतिशय वास्तववादी वाटत असल्याने योग्य तो परिणाम साधण्यात यशस्वी होतात.

| February 21, 2014 01:08 am

सध्या थरारक आणि भयपटांचा बोलबोला आहे. स्पेशल इफेक्टच्या करामतीमुळे या प्रकारातील चित्रपट अतिशय वास्तववादी वाटत असल्याने योग्य तो परिणाम साधण्यात यशस्वी होतात. नवोदीत दिग्दर्शक अभिषेक जावकर ‘सेक्स अॅण्ड डेमन’ नावाचा अशाच प्रकारचा भयपट साकारणार आहे. चित्रपटातील समैरा राव, ज्योती सेठी आणि आराध्या कपूर या तीन प्रमुख नायिकांचे अलिकडेच मुंबईत ओशिवारा भागात असलेल्या ‘निर्वाणा स्टुडिओ’मध्ये फोटो शूट पार पडले. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक जावकरदेखील उपस्थित होते. दिग्दर्शक अभिषेक जावकर यांनी २००५ नंतर ‘फॉक्स’ वाहिनीसाठी विविध जाहिरातपट तयार केले आहेत, त्याचबरोबर त्यांनी पटकथा लेखक म्हणूनसुद्धा काम केले आहे. याशिवाय दक्षिण चित्रपटसृष्टीत त्यांनी चित्रपट वितरणाचे काम केले आहे. ‘सेक्स अॅण्ड डेमन’ या आपल्या पहिल्या चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले, हा चित्रपट म्हणजे आयुष्यात थरार अनुभण्यासाठी आपल्या काही मित्रांबरोबर घनदाट जंगलातील एका बंगल्यात मुक्कामाला जाणाऱ्या तीन मुलींची काहाणी आहे. मोबाईल नेटवर्कदेखील उपलब्ध नसलेल्या या बंगल्यात सर्वांना अनेक असाधारण घटनांना सामोरे जावे लागते. या सर्वांबरोबर नेमके काय होते, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
समैरा राव, ज्योती सेठी आणि आराध्या कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या आधी त्यांनी टीव्ही मालिकांबरोबर पंजाब आणि दक्षिणेकडील चित्रपटांमधून काम केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव येथे या चित्रपटाचे सलग चित्रीकरण करण्यात येणार आहे. ‘रेनौड इन्कॉर्प’च्या बॅनरखाली बनणाऱ्या या चित्रपटाला नक्ष अजीज संगीत देणार आहेत. हा चित्रपट या वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 1:08 am

Web Title: glamorous girls on shoot for hindi film sex demon
Next Stories
1 घुंगराच्या नादात
2 फर्स्टलूक: सोनाक्षी सिन्हाचा ‘तेवर’
3 ‘फँड्री’ देशभ्रमणाला तयार !
Just Now!
X