24 November 2020

News Flash

‘बिग बॉस १४’मध्ये होणार राधे माँ यांची एण्ट्री

नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोवरुन हे स्पष्ट झाले आहे.

लवकरच छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस १४’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण बॉलिवूड अभिनेता सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची यादी अद्याप समोर आलेली नाही. मात्र आता शोमध्ये राधे माँ यांची एण्ट्री होणार असल्याचे समोर आले आहे.

नुकताच कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शोचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये राधे माँ यांची घरात एण्ट्री झाल्याचे दिसत आहे. पण राधे माँ स्पर्धक म्हणून शोमध्ये दिसणार की पाहुण्या म्हणून आल्या आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता बिग बॉस १४मध्ये आणखी कोणते कलाकार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी राधे माँ यांनी बिग बॉस पर्व १४साठी होकार दिला असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. बिग बॉसच्या निर्मात्यांनी बिग बॉस १३साठी देखील राधे माँ यांना विचारले होते. पण काही कारणास्तव त्यांनी नकार दिला होता. पण आता आगामी सीझनमध्ये राधे माँ या दिसणार असल्याचे म्हटले जात होते. याबाबत त्यावेळी राधे माँ यांच्या टीमकडून किंवा बिग बॉसकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. आता शोचा प्रोमो पाहता या सर्व चर्चा खऱ्या ठरल्याचे दिसत आहे.

‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉस १४मध्ये नैना सिंह, जस्मिन भसीन, करण पटेल, निशांत मलकानी, एजाज खान, राहुल वैद्य, सारा गुरपाल, शगुन पांडे, प्रतीक सेजलपाल आणि जान कुमार सानू हे कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच ‘बिग बॉस १४’ ३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 7:09 pm

Web Title: godwoman radhe maa makes an entry in the controversial house bigg boss avb 95
Next Stories
1 अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अरबाजने केला मानहानीचा दावा
2 “दोषींना फाशी द्या”; सामूहिक बलात्काराच्या घटनेवर अक्षय कुमार संतापला
3 केबीसी प्ले अलाँग : दररोज १० विजेते, १० लाख रूपयांचे बक्षीस
Just Now!
X